VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
जनसंपर्क कार्यालयात पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन ज्येष्ठ भाजप नेते भुरसे यांचा सन्मान,
गडचिरोली, 10 ऑक्टोबर 2026::- भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे यांचा वाढदिवस शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथील माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण आणि स्नेहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी डॉ. अशोकजी नेते यांनी रमेशजी भुरसे यांना पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच मिठाई भरवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि आगामी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
या प्रसंगी भाजपचे नगरसेवक सागरजी निंबोरकर, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकरजी पेटकर, भाजपा नेते अविनाशजी विश्रोजवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी रमेशजी भुरसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. यामुळे जनसंपर्क कार्यालयातील वातावरण आनंदमय झाले होते.
