Saturday, October 17, 2026
HomeGhotव्यसनमुक्तीचा संदेश अन् शासकीय योजनांची जनजागृती! ‘मोदी गाथा’ कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

व्यसनमुक्तीचा संदेश अन् शासकीय योजनांची जनजागृती! ‘मोदी गाथा’ कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्या नेतृत्वात आयोजन; चामोर्शी, गडचिरोली आणि धानोरा तालुक्यांत कार्यक्रमाला उत्साह,

घोट, 17 ऑक्टोबर 2026::-गडचिरोली जिल्ह्यात व्यसनमुक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘मोदी गाथा’ कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील चामोर्शी, गडचिरोली आणि धानोरा तालुक्यांतील विविध ठिकाणी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत कार्यक्रमाचा लाभ घेतला.

दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमाचे नेतृत्व गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मिलिंद भाऊ नरोटे, माजी खासदार अशोक भाऊ नेते आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश भाऊ बारसागडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक प्रणय भाऊ खुणे आणि सहसमन्वयक साई भाऊ सिल्लमवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी कार्यक्रम पार पडले.

व्यसनांपासून दूर राहा, कुटुंबाचे भविष्य घडवा :-

‘मोदी गाथा’ कार्यक्रमातून समाजात वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेच्या समस्येवर प्रकाश टाकण्यात आला. व्यसनामुळे व्यक्तीचे आरोग्य, कौटुंबिक जीवन आणि आर्थिक परिस्थितीवर होणारे दुष्परिणाम अधोरेखित करण्यात आले. नागरिकांनी व्यसनांपासून दूर राहून स्वतःचे आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करावे, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

तसेच व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी जनजागृतीची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. तरुणांनी व्यसनांच्या आहारी न जाता शिक्षण, रोजगार आणि आर्थिक प्रगतीकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन करण्यात आले.

शासकीय योजनांचा लाभ घ्या, आर्थिक प्रगती साधा :-

केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती कार्यक्रमातून देण्यात आली. पात्र नागरिकांनी शासनाच्या योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, आर्थिक उन्नती साधावी आणि आपल्या कुटुंबाचे जीवनमान सुधारावे, यावर भर देण्यात आला.

ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळावी आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती :-

या कार्यक्रमाला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये, मास्टर किशोर कुंडू, दिनेश मुजुमदार, संदीप भोवरे, पलाश घरामी, सुमेन विश्वास, समीरण रॉय, तारक हलदर, विलास वडेट्टीवार यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यसनमुक्ती, शासकीय योजनांची जनजागृती आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीचा संदेश देणाऱ्या ‘मोदी गाथा’ कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादामुळे ग्रामीण भागात या विषयांबाबत जनजागृती करण्याच्या उपक्रमाला चालना मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular