Saturday, October 17, 2026
HomeGadchiroliगडचिरोलीत २० ऑक्टोबरला आदिवासी देवी-देवतांची महापूजा व दसरा सणानिमित्त भव्य कार्यक्रम...

गडचिरोलीत २० ऑक्टोबरला आदिवासी देवी-देवतांची महापूजा व दसरा सणानिमित्त भव्य कार्यक्रम…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गोटूल समिती व विविध आदिवासी संघटनांचा संयुक्त पुढाकार; आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते उद्घाटन, अनेक मान्यवरांची उपस्थिती,

गडचिरोली, 17 ऑक्टोबर 2026::- आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्याच्या उद्देशाने गोटूल समिती गडचिरोली व विविध आदिवासी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी दसरा सणानिमित्त आदिवासी देवी-देवतांची महापूजा व भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोली शहरातील गोटूल भूमी, चांदाळा रोड, इंदिरानगर येथे दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात दुपारी १२ वाजता देवी-देवतांच्या महापूजेने होईल. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता तिर. देवाजी तोफा साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. याच वेळी गोटूल भूमीच्या विकासासंदर्भात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले असून, उपस्थित विविध संघटनांच्या बंधू-भगिनींकडून गोटूल भूमीच्या विकासाबाबत विचारमंथन केले जाणार आहे. दुपारी १.३० ते ३ वाजेपर्यंत मान्यवरांचे मार्गदर्शन होणार असून, कार्यक्रमाच्या समारोपानंतर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते उद्घाटन :-

या कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार तिर. डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते होणार आहे. गोटूल समिती गडचिरोलीचे अध्यक्ष तिर. नंदू नरोटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

अनेक मान्यवरांची उपस्थिती :-

कार्यक्रमाला माजी खासदार डॉ. अशोक नेते, आरमोरीचे आमदार रामदासजी मसराम, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार आनंदरावजी गेडाम आणि माजी आमदार दीपकदादा आत्राम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

तसेच तिर. फरेंद्र कुतरीकर, तिर. डॉ. सचिन मडावी, डॉ. चंदा कोडवते, तिर. प्रकाश गेडाम, तिर. माधवराव गावळ, तिर. सदानंद ताराम, तिर. मोहन पुराम आणि तिर. माधुरी मडावी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आदिवासी संस्कृतीच्या संवर्धनासाठी एकत्र येण्याचे आवाहन :-

आदिवासी समाजाच्या रूढी-परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक एकतेला बळकटी देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गोटूल भूमीच्या विकासाला चालना देणे, विविध आदिवासी संघटनांमध्ये समन्वय वाढविणे आणि समाजाच्या प्रगतीसाठी सामूहिक विचारविनिमय करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

जिल्हा गोटूल समिती तथा सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला आदिवासी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular