VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
स्मार्ट मीटर, वाढीव वीजबिल आणि वारंवार वीज खंडित होण्याच्या तक्रारींवर चर्चा; अनेक समस्यांचे जागेवरच निराकरण,
गडचिरोली /घोट, 20 ऑक्टोबर 2026::-चामोर्शी तालुक्यातील घोट येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (असो.), दिल्ली, जिल्हा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ऑक्टोबर २०२६ रोजी विद्युत ग्राहकांच्या तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला घोट-आष्टी परिसरातील शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विद्युतविषयक समस्यांना यानिमित्ताने व्यासपीठ मिळाले.
स्मार्ट मीटरपासून वाढीव वीजबिलापर्यंतच्या समस्यांवर चर्चा :-

घोट-आष्टी मंडळातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध विद्युत समस्यांवर या शिबिरात सविस्तर चर्चा करण्यात आली. स्मार्ट मीटरबाबतच्या तक्रारी, अवाजवी वीजबिल, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे तसेच इतर विद्युतविषयक अडचणींबाबत नागरिकांनी आपली व्यथा मांडली.
वीज ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांना आवश्यक माहिती व मार्गदर्शन देणे, तसेच शक्य असलेल्या समस्यांचे जागेवरच निराकरण करणे, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता. त्यानुसार अनेक नागरिकांच्या तक्रारींचे शिबिरस्थळी निराकरण करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून थेट माहिती मिळविण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले.
डॉ. प्रणय खुणे यांच्यासह विद्युत विभागाचे अधिकारी उपस्थित :-

या शिबिराला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे, प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, विद्युत वितरण कंपनीचे चामोर्शी तालुका कार्यकारी अभियंता देवगडे साहेब, उपअभियंता अस्वलकर साहेब आणि सपाट साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. ग्राहकांच्या समस्यांवर चर्चा करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. विद्युत विभाग आणि नागरिक यांच्यात थेट संवाद घडवून आणण्यात या शिबिराने महत्त्वाची भूमिका बजावली.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांचा मोठा सहभाग :-

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानूभाऊ उपाध्ये, भाजप तालुकाध्यक्ष राकेश सरकार, सरपंच सोमनाथ वैद्य, उपसरपंच मिहीर विश्वास, विनोद किरमे, मास्टर किशोर कुंडू, महेश विश्वास, दिनेश मुजुमदार, पलास घरामी, जितेन शहा, विलास सावकार वडेट्टीवार, सुमेन विश्वास, राजू सातपुते, संदीप भोवरे, समीरण रॉय, गुरुदास पालकवार, सत्यवान तंटकवार, शुभम दास यांच्यासह विद्युत वितरण कंपनीच्या घोट मंडळातील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
घोट येथे आयोजित या शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहता, वीज ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यासाठी अशा शिबिरांची नियमित आवश्यकता असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. प्रलंबित समस्या मार्गी लागल्यास परिसरातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
