Saturday, May 23, 2026
HomeSironchaसिरोंचा तालुक्यातील अंकीसा येथील प्रकाश नल्ला यांच्या कुटुंबाला राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी...

सिरोंचा तालुक्यातील अंकीसा येथील प्रकाश नल्ला यांच्या कुटुंबाला राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिला मदतीचा हात…

VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)

सिरोंचा, १२ ऑक्टोंबर २०२३ ::- सिरोंचा तालुक्यातील अंकीसा येथील स्थानिक रहिवासी श्री.प्रकाश नल्ला हे अपंग व्यक्ती असून ते रोजंदारी करून कसंबसं आपला परिवाराला आधार देत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते, पण काही दिवसा पासून ते आजारी होते आणि त्या अल्पशा आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला.

        आणि संपूर्ण प्रकाश नल्ला यांच्या कुटूंबावर खूप मोठ संकट आलं.कुटुंबात आई,पत्नी आणि दोन मुले आहेत,अत्यंविधी करण्यासाठी आर्थिक समस्या, परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेत होत.पण ही प्रकाश नल्ला कुटूंबाची आर्थिक समस्या कार्यकर्ते श्रीनाथ राऊत यांनी अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या लक्षात आणून दिली.

          त्यावेळी राजे साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या कार्यकर्ते यांच्या माध्यमातून प्रकाश नल्ला यांच्या कुटूंबाला मदतीचा हात देत *10000-/(दहा हजार) रुपये* आर्थिक मदत केली आणि शासनाच्या कल्याणकारी योजना प्रकाश नल्ला यांच्या कुटूंबाला मिळण्यासाठी मदत करनार आणि आपण सर्वतोपरी पुन्हा सहकार्य करण्याचे आश्वासन सुध्दा यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिल. त्यावेळी संपूर्ण नल्ला कुटुंबाने राजे साहेबांचे आभार मानले.विशेष बाब म्हणजे अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम हे नेहमीच आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील गरजूंना आर्थिक मदत करीत असतात.सर्वतोपरी त्यांना सहकार्य करत असतात.

         यावेळी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते श्यामसुंदरराव मेचिनेनी, तालुका महामंत्री श्रीनाथ राऊत, तालुका सचिव देवेंद्र रंगु आणि काही कार्यकर्ते, मोठ्या संख्येने अंकीसा येथील गावकरी व संपूर्ण नल्ला कुटुंब उपस्थित होत.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular