VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
सौ. मंजुषाताई विजय भागडकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन,
ब्रम्हपुरी/(चौगान), 13 नोव्हेंबर 2026:-दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त चौगान येथे आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमाला महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांनी सदिच्छा भेट देत उपस्थितांशी संवाद साधला. याचवेळी सौ. मंजुषाताई विजय भागडकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिनंदन करून त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या स्नेहमिलन सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक सलोखा, आपुलकी आणि एकजुटीचा संदेश देण्यात आला. यावेळी परिसरातील शेतकरी बांधवांच्या विविध समस्या व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सामूहिक प्रयत्न केले जातील, अशी भूमिका महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते राजेशभाऊ काबले, विलासभाऊ विखार, चौगानचे सरपंच उमेशभाऊ धोटे, ब्रह्मपुरीचे नगरसेवक अविनाशभाऊ राऊत, अशोकभाऊ रामटेके, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनूभाऊ नागतोडे, रोशन नवघडे, वासूभाऊ सुंडरकर, विजयभाऊ भागडकर, श्रावणभाऊ मैंद, अनिलभाऊ वैरागडे, सुरजभाऊ धोटे, विजयभाऊ प्रधान, अमोलभाऊ बुराडे, मनोजभाऊ वाजडे, अमितभाऊ कन्नाके, वासुदेवजी सोनडकर, वामनरावजी मैंद, सुरेशभाऊ चौधरी, सदाशिवजी ठाकरे, संतोषभाऊ मैंद, प्रमोद मैंद सर, अतुलभाऊ राऊत, प्रा. कुंदन दुपारे, सुभाषजी नन्नावरे, मधुकरभाऊ राऊत यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
