Saturday, May 23, 2026
HomeBrahmapuriBrahmapuriआगामी येणाऱ्या विधानसभेत विजयाचा संकल्प करून कार्यकर्त्यांनी काम करावे -मा.खा.अशोकजी नेते याचे...

आगामी येणाऱ्या विधानसभेत विजयाचा संकल्प करून कार्यकर्त्यांनी काम करावे -मा.खा.अशोकजी नेते याचे प्रतिपादन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रह्मपुरीत आयोजित भाजपा कार्यकर्ता महामेळावा.

 ब्रम्हपुरी विधानसभेच्या विकासासाठी पुन्हा सज्ज.

चंद्रपूर/ ब्रम्हपुरी,२७ जुलै २०२४::- भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरी विधानसभा आयोजित भाजपाचे लोकप्रिय नेते,माजी आमदार मान.प्रा.अतुलभाऊ देशकर यांच्या ६६ व्या. वाढदिवसानिमित्त भाजपा कार्यकर्ता महा मेळाव्याचे आयोजन नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय सभागृह ब्रह्मपुरी येथे‌ आयोजित करण्यात आले होते.

   या कार्यकर्ता मेळाव्याला मा.खा.तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोक जी नेते यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले झालेल्या लोकसभेत जरी पराजय झाला असेल तरी कार्यकर्ते यांनी पराजयाला खचून न जाता आगामी येणाऱ्या विधानसभेत विजयाचा संकल्प करुनच कार्यकर्त्यांनी काम करावे. लोकसभेत मतदारांची दिशाभुल व खोट प्रचार करून काँग्रेसनी विजय केला.यात संविधान बदलविणार व महिलांच्या खात्यात महिण्याला साडेआठ हजार रूपये खटाखट देऊ अशा पद्धतीचे खोटे नाटे आश्वासन देऊन मतदारांची दिशाभुल केले.काँग्रेस कडे विकासाचे मुद्दे नव्हते,विकास कामाचे व्हिजन नाही.भाजपा हे विकासाचे राजकारण करते येणाऱ्या विधानसभेत कार्यकर्ते यांनी विजयाचा संकल्प घेऊन प्रत्येक बुथावर,मतदारांच्या यादी चे वाचन करत कार्यकर्ते यांनी प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन केंद्र व राज्य सरकारचे विकासकामे सांगावे.मला लोकसभेच्या निवडणूकीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करून काम केले. अशा कार्यकर्त्यांचे व सर्व मतदारांचे आभार मानतो.

दोन दिवसांनी लोकनेते विकास पुरुष मान.ना.सुधिरभाऊ चा व आज अतुल भाऊ यांचा वाढदिवस आहे.या निमित्त दिर्घ आयुष्याच्या उदंड कोटी कोटी शुभेच्छा देतो.असे प्रतिपादन या कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी मा.खा.अशोक नेते यांनी व्यक्त केले.

मान.ना.श्री. सुधिरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने,यांच्या विशेष प्रयत्नांने सावली तालुक्यात यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेत मोठ्या संख्येनी मंजूर केल्याबद्दल तालुक्याच्या वतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आले.

 यशवंतराव चव्हाण घरकुल वसाहत या योजनेतून ढिवर व एन.टी समाजाला सावली तालुक्यात मोठ्या संख्येनी घरकुल मिळवून दिल्याबद्दल मान.ना.श्री. सुधिरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने,सांस्कृतिक कार्य,मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा यांचे भाजपा सावली तालुक्यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन केले.

माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भाजपा कार्यकर्ता महा मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थित.

मा.ना.श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय तथा चंद्रपुर जिल्हा पालकमंत्री,माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते,उत्सवमुर्ती ;- माजी आमदार अतुल भाऊ देशकर,माजी आमदार- सुधीरजी पारवे, माहिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई शेडे,माजी जि.प.अध्यक्षा संध्याताई गुरनूले, प्रा.गोपीचंद गणवीर,काशीनाथजी थेरकर, प्रा.कादर शेख सर, प्रकाशजी वाघमारे, ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष अरुणजी शेंडे,शहराध्यक्ष अरविंदजी नांदूरकर,शिंदेवाही तालुकाध्यक्ष राजुभाऊ बोरकर,सावली तालुकाध्यक्ष अविनाश पाल,माजी जि.प. उपाध्यक्ष कृष्णाजी सहारे,माजी सभापती – संतोष भाऊ तंगडपल्लीवार,माजी सभापती नागराज गेडाम,जिल्हा संघटन महामंत्री तथा माजी जि.प सदस्य- संजय गजपूरे, भाजयुमो जिल्हा महामंत्री – तनय देशकर, महिला आघाडी जिल्हा महामंत्री- निलम सुरमवार भाजयुमो तालुका अध्यक्ष -रामलालजी दोनाडकर, प्रा. सुयोग बाळबुधे, मनोज भुपाल, मनोज वठे, रशमीताई पेशने, स्वप्निल अलगदेवे,तसेच मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular