Friday, June 5, 2026
HomeChamorshiचामोर्शी तालुक्यातील समस्या मार्गी न लावता, आंदोलन करुन जनतेची दिशाभूल करणाऱ्या आमदारांनी...

चामोर्शी तालुक्यातील समस्या मार्गी न लावता, आंदोलन करुन जनतेची दिशाभूल करणाऱ्या आमदारांनी त्वरित राजीनामा द्यावा, पत्रकार परिषदेतून काँग्रेसच्या तालुकाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांचा मागणी…

VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)

केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार, तालुक्यातील जनसामान्याच्या समस्या घेऊन काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते येणाऱ्या काळात भव्य जणआंदोलन करन्याचा इशारा.

        चामोर्शी ,१६ ऑक्टोंबर २०२३ ::-    लोडशेडींग,दिना धरणाचे पाणी, रस्त्यांची दुरवस्था, बसस्थानक, क्रीडांगण, गॅसचा तुटवडा, मार्कंड देवस्थानचे दुरावस्था, रोजगाराची समस्या, निराधार योजनेचे तीनतेरा, आदी समस्या सोडविण्यास सत्ताधारी पक्षाचे आमदार अपयशी.

गेली आठ-नव वर्षापासून केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असून तालुक्यातील समस्या मार्गी लावन्याऐवजी त्या दिवसेंदिवस वाढतच आहेत , त्यामुळे चामोर्शी तालुका जनुकाही समस्यांचे माहेरघर होत चाललेला आहे की काय असे दिसून येत आहे. याला जबाबदार सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने त्यांनाच रस्त्यावर उतरून जर आंदोलन करावे लागत असेल, तर हि जनतेची दिशाभूलच म्हणावी लागेल. तेव्हा अशा निष्क्रिय आमदारांनी त्वरित राजीनामा द्यावा.अशी मागणी पत्रकार परिषदेतुन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोदभाऊ भगत, युवक काँग्रेसचे महासचिव विश्वजीत कोवासे, प्रदेश सदस्य राजेश भैय्या ठाकुर सह, पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. भाजपचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी नुकतेच भेंडाळा- हरणघाट रस्त्याच्या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी केलेले आंदोलन म्हणजे सामान्य नागरिकांची दिशाभूल करणारी असुन निवडणुकीसाठी मते मागण्याचा केविलवाणा प्रयत्न होय.उलट तालुक्यांमध्ये सिंचन, रस्ते,लोडशेडींग, शेतकऱ्यांना दिना धरणाचे पाणी, बसस्थानक क्रीडांगण, गॅसचा तुटवडा, मार्कंड देवस्थानची दुरावस्था, निराधार योजना, आदी समस्या कितपत पडलेल्या असतांना त्या सोडविण्याऐवजी आतापर्यंतच्या त्याकडे दुर्लक्ष करतांना दिसुन येत आहेत. भेडांळा रस्त्यावर चार किलोमीटरला ४ कोटी रुपये खर्च करून त्वरित रस्ता खराब झाला,दोनदा बसस्थानकाचे भुमीपुजन करून अजूनही कामाला सुरुवात झाली नाही,भेडांळा क्षेत्रात १२०० शेतकऱ्यांचे कृषीपंप असुन सप्टेंबर पासून लोडशेडींग सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक पाण्याऐवजी मरत आहेत. यावर आमदार बोलायला तयार नाही.दिणा धरणाच्या कॅनलचे पाणी शेवटच्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचल्या जातं नाही, तात्पुरत्या स्वरूपात असलेल्या बसस्थानकावर स्वच्छतागृहची सोय नाही, गॅसचा तुटवडा दोन तीन महिन्यांपासून एजंशी नाही, तालुक्यात युरीया खतांचा तुटवडा, संजय गांधी निराधार योजनेचे मानधन चार महिन्यांपासून बंद आहे, कोनसरी लगत शेकरु पार्क असताना प्रकल्पाला मान्यता मिळाली कशी, स्थानिकांना रोजगार नाही, पोलिस पाटील भरतीचा प्रश्न, आदी समस्या सोडविण्यास सत्तारूढ पक्षाचे आमदार अपयशी ठरले आहेत.त्यामुळे अशा बेजबाबदार व निष्क्रिय असलेल्या आमदार महोदयांनी चामोर्शी तालुक्यातील जनतेची दिशाभूल न करता समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करावे , अन्यथा त्वरित राजीनामा द्यावा.नाहीतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव व जनसामन्य नागरिकांना सोबत घेऊन त्यांच्या समस्यांना न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरून येत्या काळात आंदोलन करण्यात येईल, असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोदभाऊ भगत, युवक काँग्रेसचे महासचिव विश्वजीत कोवासे, प्रदेश सदस्य राजेश भैय्या ठाकुर, नगरसेवक सुमेध तुरे, किसान सेलचे तालुकाध्यक्ष दिगांबर धानोरकर,युवा नेते गुरुदेव सातपुते, काँग्रेसचे महासचिव कालिदास बुरांडे, माजी ग्रा.प.सदस्य नाजूक वाळके, सुनिल कुमरे, प्रफुल्ल बारसागडे,तेजस कोंनडेकर, ज्ञानेश्वर कुमरे,प्रकाश तुबळे, संजय दुधबळे, विनोद गेडेकर, आदींनी दिलेला आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular