Tuesday, July 28, 2026
HomeGhotघोट येथे भाजपची नियोजन बैठक...

घोट येथे भाजपची नियोजन बैठक…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

सेवा सप्ताह व आमदार मिलिंद नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांना अंतिम रूप,

गडचिरोली/घोट,२७ जुलै २०२६::- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह तसेच गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मिलिंदभाऊ नरोटे यांच्या ३० जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध सामाजिक कार्यक्रमांच्या नियोजनासाठी घोट येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणयभाऊ खुणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि भाजपा मंडळ अध्यक्ष राकेश सरकार यांच्या उपस्थितीत ही बैठक रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी घोट येथील ज्येष्ठ नेते नानूभाऊ उपाध्ये यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली.

या बैठकीत रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्र तसेच घोट-सुभाषग्राम जिल्हा परिषद क्षेत्रात सेवा सप्ताहाच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपण, जनजागृती, समाजोपयोगी सेवा आणि लोकहिताच्या विविध कार्यक्रमांचे प्रभावी नियोजन करण्यात आले.

यावेळी परिसरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सेवा सप्ताह आणि आमदार मिलिंदभाऊ नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रम यशस्वी करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीत संबंधित क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने सहभागी होऊन सेवा कार्यात योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. सेवा, समाजहित आणि विकासाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular