Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliवीज खंडित केलेल्या कृषी पंपांची पुन्हा वीज जोडणी तातडीने करून द्या ,...

वीज खंडित केलेल्या कृषी पंपांची पुन्हा वीज जोडणी तातडीने करून द्या , आमदार डॉक्टर देवरावजी होळी…

VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)

पाऊस थांबलेला असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी विजेची आवश्यकता

किमान १ महिना कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज खंडित करू नये.

गडचिरोली ,१७ ऑक्टोंबर ,२०२३ ::- सद्यस्थितीत जिल्ह्यात पाऊस थांबलेला असून पिकांना पाणी पुरवठा करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र यापूर्वीच शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज कापण्यात आलेली असल्याने शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झालेला आहे त्यामुळे कापण्यात आलेल्या कृषी पंपांची वीज जोडणी तातडीने करून द्यावी, तसेच पुढील किमान १ महिना कोणत्याही कृषी पंपाची वीज कापण्यात येऊ नये अशी सूचना आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी प्रशासनाला केली आहे.

        लागवड केलेल्या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता असून सिरोंचा परिसरात प्रवासात असताना रेगुंटा व त्या भागातील अनेक कृषी पंपाची वीज कापण्यात आल्याचे दिसुन आले. तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्रातीलही नवग्राम, गुरवळा, जेप्रा, अमिर्झा इत्यादी गावांमध्ये अशा वीज कापण्यात आलेल्या कृषी पंपाची वीज जोडणी करावयाची आहे. सध्या स्थितीमध्ये पाण्याची नितांत आवश्यकता असून विहिरीत पाणी असूनही वीज जोडणी नसल्याने शेतकरी हवालदार झालेला आहे. त्यामुळे अशा प्रलंबित कृषी पंपाच्या वीज जोडणी तातडीने करून द्यावी. तसेच या कालावधीत परिस्थितीमुळे बिल न भरलेल्या शेतकऱ्यांची वीज कोणत्याही परिस्थितीमध्ये खंडित करण्यात येऊ नये अशीही सूचना त्यांनी या माध्यमातून प्रशासनाला केली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular