Sunday, September 13, 2026
HomeMumbaiगडचिरोली जिल्ह्यामध्ये ९ नवीन तालुक्याची निर्मिती करा,महसूल मंत्रिकडे  आ. होळी यांची मागणी...

गडचिरोली जिल्ह्यामध्ये ९ नवीन तालुक्याची निर्मिती करा,महसूल मंत्रिकडे  आ. होळी यांची मागणी…

VAINGANGA NEWS 24 ( विशेष प्रतिनिधी)

 आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे कडे मागणी.

मुंबई मंत्रालयात भेट घेऊन पत्राद्वारे केली मागणी.

पोटेगाव, पेंढरी, आष्टी, घोट ,कसनसूर , जीमलगट्टा, असरअली, पिसे वडधा व मालेवाडा या नवीन तालुक्याची निर्मिती करण्याची केली विनंती.

  मुंबई,१९ ऑक्टोंबर २०२३ ::- गडचिरोली जिल्हा हा विस्ताराने प्रचंड लांब असून अनेक तालुके शेवटच्या गावाला फारच लांब पडतात त्यामुळे या जिल्ह्यामध्ये नवीन तालुक्यांची निर्मिती करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी ९ नवीन तालुक्याची निर्मिती करावी अशी मागणी राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.   विद्यमान ८ तालुक्यांचे विभाजन करून नवीन ९ तालुक्यांची निर्मिती करावी असे निवेदन सादर केले असून त्यात गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव ,धानोरा तालुक्यातील पेंढरी, चामोर्शी तालुक्यातील आष्टी , घोट ,एटापल्ली तालुक्यातील कसनसुर, अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, सिरोंचा तालुक्यातील असरअली, आरमोरी तालुक्यातील पिसे वडधा , कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा या मोठ्या गावांची तालुका म्हणून निर्मिती करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular