Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliशेतपिकांची प्रचंड नुकसान करणाऱ्या रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करून नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक...

शेतपिकांची प्रचंड नुकसान करणाऱ्या रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करून नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करा..

VAINGANGA NEWS 24 ( विशेष प्रतिनिधी)

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडे मागणी.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी.

रानटी हत्तींच्या हल्ल्यात ठार झालेल्या वन कर्मचाऱ्यांना व दिभना येथील होमाजी गुरनुले या शेतकऱ्यांच्या परिवाराला तातडीनं आर्थिक मदत देण्याची केली मागणी.

गडचिरोली,१९ ऑक्टोंबर २०२३ ::- जिल्हयात व तालुक्यामध्ये रानटी हत्तींनी प्रचंड हाहाकार माजवला असून शेत पिकांची प्रचंड नासधूस व दोघांना ठार केले आहे. त्यामूळे शेतपिकांची प्रचंड नुकसान करणाऱ्या या रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व मृत्यू पावलेल्या मृतकांच्या परिवारांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई मंत्रालयात भेट घेवून पत्राद्वारे केली व वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडे निवेदनाच्या माध्यमातून केली.

       मागील  काही महिन्यांपासून गडचिरोली जिल्हयात व ८- १० दिवसांपासुन गडचिरोली तालुक्यामध्ये रानटी हत्तींनी प्रचंड धुडगूस घातला असून शेत पिकांची प्रचंड नुकसान केली आहे. काही दिवसांपूर्वी वन कर्मचाऱ्याला ठार केल्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी गडचिरोली तालुक्यांतील दिभना येथील  होनाजी गुरनुले या शेतकऱ्याला पायाखाली चिरडून धार केल्याने लोकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे.

      ज्या शेतपीकांची प्रचंड नासधूस करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे त्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची आवश्यकता आहे. तसेच रानटी हत्तींच्या हल्ल्यात ठार झालेल्या  मृतकांच्या परिवाराला तातडीनं आर्थिक मदत देऊन या पीडित परिवारांना सहाय्य करण्याची आवश्यकता आहे.

      त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय घेऊन या रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना व मृत्यू पावलेल्या मृतकांच्या परिवारांना तातडीने आर्थिक करावी अशी विनंती आमदार डॉ देवराव जी होळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व वनमंत्री ना .सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडे केली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular