Saturday, May 23, 2026
HomeAheriमाजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी सद्दूला बतकाम्मा...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी सद्दूला बतकाम्मा उत्सवाला भेट…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

  अहेरी,२२ ऑक्टोंबर २०२३ ::- “बतकाम्मा”तेलंगणा राज्यातील संस्कृतीशी जोडलेल्या बतकम्मा उत्सवाची परंपरा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील महिला जोपासत आहेत.पित्रूमोक्षा अमावास्येला सुरू होणार्‍या या सणाची दसऱ्याच्या आदल्या दिवशी सांगता केली जाते.हा सण काकतीया साम्राज्याच्या कालावधीपासून तेलंगणात मोठ्या उत्साहात साजरा करतात.बतकम्मा उत्सवादरम्यान बांबूच्या परडी वर विविध प्रकारची फुले ठेवून त्यांना एक विशिष्ट प्रकारचा आकार दिला जातो.सजविलेल्या फुलांना बतकम्मा म्हणतात.       अहेरी तालुक्यातील दरवर्षी प्रमाणे”या”वर्षी सुद्धा बतकाम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.देवालमारी येथील सद्दूला बतकाम्मा उत्सवाला आविस तथा अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती मा. अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी भेट घेतले.तसेच गंगादेवीचे दर्शन घेतले. यावेळी अजयभाऊंनी गावातील जेष्ठ नागरिकांन सोबत विविध विषयांवर चर्चा केले.        यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत,माजी जि.प.सदस्य अजय नैताम, ग्राम पंचायत सदस्य मिनाताई गर्गम, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नरेश गर्गम,राकेश सडमेक,महेश लेकुर,संजय गोंडे,सिनूभाऊ राऊत,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील जेष्ठ नागरिक – महिलागण उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular