Sunday, May 24, 2026
HomeChamorshiभाजपाने कंत्राटी व खाजगी नोकर भरतीचा जीआर रद्द करून काँग्रेस राष्ट्रवादीचे पाप...

भाजपाने कंत्राटी व खाजगी नोकर भरतीचा जीआर रद्द करून काँग्रेस राष्ट्रवादीचे पाप धुतले,आ.डॉ.देवराव होळी यांचे प्रतिपादन…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

२०१० मध्ये कंत्राटी व खाजगी नोकरी भरतीचा जीआर काढणाऱ्या विद्यमान महाविकास आघाडीचा चामोर्शी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र निषेध.

जीआर रद्द करणाऱ्या ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे मानले आभार.

चामोर्शी,२२ ऑक्टोंबर २०२३ ::- काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वातील तात्कालीन सरकारने 2010 मध्ये कंत्राटी नोकर भरतीचा काढलेला जीआर ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून रद्द करण्यात आल्याने काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांचे पाप महायुतीच्या सरकारने धुतले असल्याची प्रतिक्रिया आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी काँग्रेस ,शिवसेना (उबाठा) शरद पवार (राष्ट्रवादी) या महाविकास आघाडीचा चामोर्शी तालुका भाजपाच्या वतीने निषेध करताना केले.

          यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष आनंद भांडेकर,ज़िल्हा सचिव दिलीप चलाख,ज़िल्हा उपाध्यक्ष स्वप्निल वरघंटे,शहर अध्यक्ष सोपान नैताम, तालुक़ा उपाध्यक्ष जयराम चलाख,तालुक़ा महामंत्री, भोजराज भगत,युवा मोर्चा तालुक़ा अध्यक्ष प्रतीक राठी,तालुक़ा सचिव उमेश कूकड़े,ओबीसी आघाड़ी महामंत्री काशीनाथ बुरांडे, विष्णु ढाली,दिपक वासेकर,डोमदेव वन्नेवार, युवा मोर्चा महामंत्री रामचंद्र वरवाडे, निखिल धोडरे, लोमेश सातपूते, नीरज रामानूजमवार,नरेश अलसावार,अनिल बोदलकर, नगरसेविका रोशनीताई वरघंटे,कविताताई किरमे संजू खेड़ेकर, साई गव्हारे,भुवनेश्वर चुधरी,शेषराव कोहले,येशवंत त्रिकांडे,प्रकाश सातपूते,विलास चरडूके,राजू धोडरे यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular