VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
व्येंकटरावपेठा येथील अहेरी रस्त्यावरील बतकम्मा उत्सव हे मोठे उत्सवाने साजरा करण्यात येते. माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी काल ह्या बतकम्मा मंडळाला भेट देत सदुला बतकम्माचे पूजन केले.
ह्यावेळी मंडळाने राजेंची जोरदार स्वागत केले, लहानापासून मोठ्या पर्यंत सर्वांनीच राजेंसोबत छायाचित्रे घेतली.
ह्यावेळी बोलतांना राजेंनी नवरात्र तथा बतकम्मा उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच ह्या पुढेही मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
ह्यावेळी माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी मंडळाच्या समस्या जाणून घेतल्या. ह्या कार्यक्रमाला व्येंकटरावपेठा सह परिसरातील जनतेची तुडुंब गर्दी झाली होती.
