VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
जयनगर येथिल दुर्गा उत्सव निमित्त्याने आयोजित कार्यक्रमात आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिति.
चामोर्शी ,२५ ऑक्टोंबर २०२३ ::- तालुक्यातील जयनगर / विक्रम्पुर येथिल सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचे उदघाटक म्हणून आमदार डॉ. देवरावजी होळी होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दुर्गा मातेचे दर्शन घेऊन कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. हे राजकीय व्यासपीठ नाही. परंतु गावाच्या विकासासाठी आपण विकासकामे देत असतो पण मात्र येथिल लोकप्रतिनिधी विकास कामाला विरोध करित असल्याने येथिल विकास कामे होण्यास अडचण निर्माण होत आहे. म्हणून ग्रामस्थानी एकसंघ होऊन गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपली एकजूट असायला पाहिजे. परंतु तशी परिस्थिती दिसून येत नसून विकास कामाला विरोध न करता गाव विकासासाठी येण्याची एकत्र येण्याची गरज आहे.
याप्रसंगी भाजपा जिल्हा दिलीपजी चलाख, भाजपा आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेशजी शहा, बिधानजी रॉय , विनोद पेशट्टीवार, मोरेश्वरजी डांगे, तथा मंडळाचे, सदस्य गण तथा ग्रामस्थ मोठ्या सख्येने उपस्थित होते.
