VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
रामनगर गडचिरोली येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट.
गडचिरोली, ६ नोव्हेंबर २०२३ ::- भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे प्रभारी व लोकसभेचे समन्वयक श्री प्रमोदजी पिपरे यांची गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी रामनगर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
याप्रसंगी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ योगिता ताई पिपरे यादेखील उपस्थित होत्या. सदर भेट ही सदिच्छा भेट होती . भेटीच्या दरम्यान केवळ विद्यमान राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या माध्यमातून दिली.
