Saturday, May 23, 2026
HomeEtapalliतालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर एनएचएम कर्मचा-यांचे आंदोलन...

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर एनएचएम कर्मचा-यांचे आंदोलन…

         VAINGANGA NEWS 24

( प्रतिनीधी – महेंद्र सुल्ववार)

एटापल्ली,८ नोव्हेंबर २०२३ ::- राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांचे शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे या मागणीला घेऊन एटापल्ली तालुक्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य कर्मचा-यांनी बेमुदत काम बंद आंदोलन २५ ऑक्टोम्बरपासुन एटापल्ली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेले असुन मागण्या पुर्ण होईस्तोवर आंदोलनावर ठाम राहणार असल्याने वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खडबड माजली आहे. एटापल्ली तालुका हा भौगोलीक दृष्टया अतिदुर्गम आदिवासी, व डोंगराळ भाग असुन सदर तालुक्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान , अंतर्गत कंत्राटी कर्मचारी १२ ते १५ वर्षांपासुन आरोग्य सेवा देत आहेत.

एटापल्ली तालुक्यातील एकुण ८१ आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. ८१ आरोग्य कर्मचारी बेमुदत कामबंद

आंदोलनात सहभागी आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचा-यांना बिनशर्त वयाची अट शिथिल करुन रिक्त पदावर समायोजन करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीमार्फत यापुर्वी शासनास वेळोवेळी निवेदन १६ ऑक्टोम्बरपासुन बेमुदत आंदोलन करण्यात येईल असे म्हटले होते. परंतु सरकारला गांभिर्याने विचार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणुन १६ ऑक्टोम्बर २०२३ ला एकदिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच १७ ते २३ ऑक्टोम्बर या कालावधीत एटापल्ली तालुक्यात असहकार लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. मात्र शासनाने दखल घेतली नसल्याने २५ ऑक्टोम्बर २०२३ ला इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे आंदोलन मोर्चा काढण्यात आले होते. एटापल्ली तालुक्यातील सर्व आरोग्य संस्थामधील सर्व कंत्राटी आरोग्य सेविका, कंत्राटी आरोग्य सहाय्यीका, तालुका लेखापाल, बिसीएम, आरकेएसके समुपदेशक, एनसीडी समुपदेशक, सिएचओ, कुष्ठरोग,टिबी तंत्रज्ञ, एक्सरे टेक्नीशियन, फार्मासिस्ट इतर सर्व कंत्राटी आरोग्य कर्मचा-यांनी जोपर्यंत समायोजन करित नाही, तो पर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन करुन ३० व ३१ ऑक्टोम्बर ला मुंबई येथील आझाद मैदानात विशाल धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. मुंबई येथील आकोश आंदोलनामध्ये समायोजनाच्या मागण्यासह इतर मागण्या संदर्भात जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत बेमुदत काम बंद ठेवण्यात येईल. सर्व कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी संपावर गेल्यामुळे तालुक्यातील आरोग्य कर्मचारी रिक्त पदामुळे इतर नियमित आरोग्य कर्मचारी अधिक अडचणीत आले असुन आरोग्य सेवा कोलमडली आहे. त्यामुळे आरोग्य विभागात चांगलीच खळबळ माजली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular