VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
देसाईगंज तालुक्यात आंदाचा सिधा वाटपाला सुरवात…
वडसा ,७ नोव्हेंबर ,२०२३ ::- महाराष्ट्र राज्यातील महायुती शासनाच्यावतीने गत वर्षी प्रमाणे यावर्षी दिवाळी सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर येथील लाभार्थी शिधा पत्रिकाधारक कुटुंबियांना ६ नोव्हेंबर रोजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते दिवाळी शिधा किट वितरित करून सुरुवात करण्यात आले. यावेळी भाजपा कार्यकर्ते प्रमोद झिलपे, वासुदेवजी झीलपे ग्रा.पं. माजी उपसरपंच, हेमंत दर्वे पोलिस पाटील, माधव येलतूरे ज्येष्ठ का्यकर्ते भाजपा, भापुलादजी बेद्रे, मंजुषा मेश्राम, गोपाल बोरकर, सौ. शारदा उमाजी कुथे राशन विक्री दुकानदार, प्रीती दुद्दुलकर मॅडम तहसीलदार, पाटील साहेब नायब तहसिलदार, मोरेजी पोलिस अधिकारी, मंगरेजी तलाठी कोकडी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संखेत शिधा कार्ड धारक लाभार्थी उपस्थित होते.
शिधा किट साहित्यात साखर, पामतेल, रवा, चणा दाळीसह पोहे आणि मैदाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे लाभार्थी शिधाधारक गरीबाच्या ‘दिवाळीचा गोडवा वाढला आहे. केंद्र शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अन्नधान्याचे वाटप लामार्थी शिधापत्रिकाधारकांना केले जाते. महाराष्ट्र राज्यातील शिंदे, फडणवीस, अजित पवार सरकारने गणेशोत्सवाचे निमित्त साधून राज्यातील पात्र लाभार्थ्यांना गणेशोत्सवात आनंदाचा शिधा अंतर्गत प्रत्येकी एक किलो रवा, हरभरा डाळ, साखर आणि एक लिटर तेल समावेश असलेली साहित्याची किट शंभर रुपयामध्ये वाटप केले होते. आता त्याच प्रकारची साहित्याची किट दिवाळीनिमित्त केवळ १०० रुपयातच देण्यात येत असून यात अर्धा किलोग्रॅम पोहे आणि मैदाही देण्यात येणार आहे. मागीलवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने प्रथमच आनंदाचा शिधा वाटप करून त्याची सुरुवात केली होती.
