Saturday, May 23, 2026
HomeMulcheraभविष्यात जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार - मंत्री धर्मराव बाबा आत्राम...

भविष्यात जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार – मंत्री धर्मराव बाबा आत्राम…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

लगाम येथे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा जाहीर सत्कार.

मुलचेरा, ०५ डिसेंबर २०२३ ::- महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेक मोठमोठे निर्णय घेण्यात आले.विशेष म्हणजे राज्याला देवेन्द्र फडणवीस, अजित पवार सारखे अनुभवी नेते लाभले आहे.त्यामुळे महराष्ट्रात न भूतो न भविष्य असा विकास कामांचा सपाटाच सुरू आहे.राज्य सरकारचा गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष असून भविष्यात जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.        मुलचेरा तालुक्यातील लगाम येथे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम दरम्यान ते बोलत होते.यावेळी माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,राकॉ चे जेष्ठ कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर,श्रीनिवास गोडशेलवार,राकॉचे जेष्ठ कार्यकर्ते अमित मुजुमदार,लगामचे सरपंच दीपक मडावी,येल्लाचे उपसरपंच दिवाकर उराडे, माजी प स सभापती नामदेव कुसनाके,प्राचार्य शैलेंद्र खराती,ग्रा प सद्स्य सुशील खराती,जेष्ठ कार्यकर्ते जोगदास कुसनाके,महादेव सिडाम,ग्रा प सदस्य रीना मुजुमदार,उमा आत्राम,वेदिका गनलावार,राजू पम्बालवार तसेच परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.    पुढे बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण जगात भारत देशाचा डंका वाजत आहे.येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे याही पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.रोजगार,शिक्षण आणि सिंचन हे माझे स्वप्न असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.एवढेच नव्हेतर होणाऱ्या विविध विकास कामांचे कुणी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी जनतेला ते चांगल्याप्रकारे कळते असा विरोधकांना टोलाही लगावला.        धर्मराव बाबा आत्राम यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर विदर्भातील विविध भागात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन खाते व गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व असल्यामुळे सध्या ते व्यस्त आहेत.मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते ४ डिसेंबर रोजी मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील जाहीर सत्कार कार्यक्रमात उपस्थित राहून शुभेच्छा स्वीकारले.

फटाक्यांचा आतषबाजी करत जल्लोषात स्वागत.        जाहीर सत्कार कार्यक्रम प्रसंगी लगाम येथे आगमन होताच परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांचा आतषबाजी करत ना.धर्मराव बाबा आत्राम यांचा जंगी स्वागत केले. तर,मंचावर भला मोठा हार गळ्यात टाकून “धर्मराव बाबा आगे बढो हम तुम्हारे साथ है” अश्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular