VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
अहेरी, ०५ डिसेंबर २०२३ ::- अहेरी शहरातील शिवाजीनगर, प्रभाग क्रमांक ६ मधील १ कोटी ८० लक्ष रुपयांचा सिमेंट रोड,नाली सह विविध विकासकामांचे भूमिपूजन तथा लोकार्पण माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या शुभहस्ते काल संपन्न झाले,
प्रभागातील गेल्या अनेक वर्षांची समस्या ह्या प्रभागातील भाजपाचा नगरसेविका दिपाली मुकेश नामेवार यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून सोडविल्याने शिवाजीनगर प्रभागातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे,
ह्या कार्यक्रमाला युवानेते अवधेशराव बाबा, चितेश्वरराव बाबा, भाजपाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवाजीनगर प्रभागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

