Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliआ.डॉ. देवरावजी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम,, वाढदिवसानिमित्त...

आ.डॉ. देवरावजी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम,, वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छाचा वर्षाव…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली जिल्हा उद्योग क्रांतीचे जनक, विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला.    श्री साई इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे आभा कार्ड वाटप व वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला ,    ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजण करण्यात आले होते या शिबिराचे उदघाटण आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.    ग्रामीण रुग्णालय भामरागड येथिल पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने फळ वाटप करण्यात आले.    गडचिरोली शहरातील गरीब मनोरुग्णांना ब्लॅकेट चे वाटप करण्यात आले. सोबतच काम करणाऱ्या गरीब मजूर, कामगारांना आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या टी-शर्टचे वाटप करण्यात आले.         गडचिरोली जिल्हा उद्योग क्रांतीचे जनक, विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉक्टर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर व तालुक्याच्या वतीने गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात वृक्षारोपणाचा कार्यक्रम तर महिला व बाल रुग्णालयामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम उत्साहाने घेण्यात आला.        यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे, भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, तालुक्याचे अध्यक्ष विलासभाऊ भांडेकर,     माजी नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर , जिल्हा भाजपा सचिव वर्षाताई शेडमाके, जिल्हा भाजपा नेते मधुकर भांडेकर,    भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविताताई उरकुडे ,माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम ,     निमाताई उंदीरवाडे , लताताई लाटकर, भटक्या आघाडीचे नेते गोवर्धनजी चव्हाण ,देवाजी लाटकर, प्राध्यापक उराडे सर, , कारागीर आघाडीचे नरेश हजारे ,तालुका महामंत्री बंडूभाऊ झाडे,   विलास नैताम ,आदिवासी आघाडीचे विजय शेडमाके, सोमेश्वर धकाते सुरज मस्के शहर महामंत्री विनोद देवोजवार, रश्मीताई वाघमारे सुंदराबाई कडकाडे, राजूभाऊ शेरकी, डंबाजी झरकर ,   बबनराव सूर्यवंशी, यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular