VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
हरीचंद्र साप्रदाय भागवत सप्ताह निमित्य मौजा विकासपल्ली येथे आ. डॉ. देवरावजी होळी यांनी दिली भेट.
चामोर्शी, २१ डिसेंबर २०२३ ::- धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने गावामध्ये एक सदभावाचे वातावरण निर्माण होऊन समाजामध्ये एकोपा निर्माण होण्यास मदत मिळत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी विकासपल्ली येथे हरिश्चंद्र सांप्रदाय भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमाला भेट दिली असता केले.
मागील ३ दिवसापासून मौजा विकासपल्ली येथे भागवत सप्ताह सुरु असुन त्यानिमित्ताने आमदार महोदयांनी या ठिकाणी भेट दिली.याप्रसंगी भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, भाजपा बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा, हरिश्चन्द्र जी ठाकूर तथा समिती पदाधिकारी, कार्यकर्ते व भक्तगन उपस्थित होते.
