VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
चामोर्शी वासीयांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली व अखेर उजेड झाला.
आष्टी मार्ग, घोट व आलापल्ली रस्त्यावरील वाढीव ट्रीट लाईटला मंजुरी देण्यात यावी अशी केली मागणी.
गडचिरोली / चामोर्शी,०४- ०१- २०२४ ::-मागील काही दिवसांपासून चामोर्शी येथील महामार्गावरील रस्त्यांचे पथदिवे सुरू करण्यात यावे व अंधार दूर करावा यासाठी आमदार डॉक्टर देवरावजी होळी सतत प्रयत्नरत होते अखेर त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले व या रस्त्यावरील पथदिव्यांचे लोकार्पण त्यांचेच हस्ते लाईट सुरु करून करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रतिक राठी , भाजयुमो शहर अध्यक्ष भाविक आभारे, विनोद पेशटटीवार , रामचंद्र वरवाडे , महादेव थोरेवार, गुड्डेवार, महामार्ग व विद्युत विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची सहभाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आष्टी मार्ग, घोट व आलापल्ली रस्त्यावरील वाढीव ट्रीट लाईटला मंजुरी देण्यात यावी अशी मागणी केली.
