Sunday, June 7, 2026
HomeChamorshiमहिलांना सक्षम बनविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार रोजगार उपलब्ध करून देणार,,आमदार डॉ....

महिलांना सक्षम बनविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार रोजगार उपलब्ध करून देणार,,आमदार डॉ. देवरावजी होळी…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

चामोर्शीत येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण भव्य महिला शिबीरात १ हजार ८ ९१ प्रमाणपत्राचे वाटप व सांस्कृतिक कार्यक्रम.

 गडचिरोली/ चामोर्शी,०४-०१-२०२४ ::-चामोर्शी नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने मुख्यमंत्री शासकीय योजना सुलभीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान व विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत समाज कल्याण विभाग व दिअंथो राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांचे संयुक्त विद्यमाने भव्य महिला शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रम नगरपंचायत प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ३ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता सावित्रीबाई फुले जंयती व बालिका दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम घेण्यात आले . या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ .देवरावजी होळी यांच्या हस्ते करण्यात आले .      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयश्री वायलालवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे , मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर ,महिला बालकल्याण सभापती गिताताई सोरते , उपसभापती स्नेहा सातपुते, नगरसेविका वर्षा भिवापुरे , प्रेमाताई आईंचवार , काजल नैताम , सोनाली पिपरे , वंदना गेडाम , ओवी भिवापुरे , भाजपाचे जिल्हा सचिव दिलीप चलाख, बंगाली सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश शाहा,प्रतिक राठी, जयराम चलाख ‘ कर निरीक्षक भारत वासेकर , सोशल मीडिया प्रमुख तुषार सातपुते, अलकेश बन्सोड आदी मान्यवर उपस्थित होते .  आपल्या उद्‌घाटनिय भाषणात आमदार डॉ. देवराव होळी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने महिलांचे सशक्तिकरण सबलीकरण शासन स्तरावरून मिळणाऱ्या सर्व योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचा मुख्य हेतू असून समाजातील सर्व तळागाळातील महिला पर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यात येऊन त्याचा लाभ महिलांनी घ्यावा तसेच नगरपंचायत प्रशासनातर्फे पोहोचविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ सुद्धा महिलांनी घ्यावा असे आवाहन याप्रसंगी आमदार महोदयांनी केले .या कार्यक्रमादरम्यान नगरपंचायत चामोर्शीच्या वतीने वैयक्तिक स्वच्छालय प्रमाण पत्र २८,घरकुल योजना प्रमाणपत्र – १२ , दिव्यांग महिला निधी प्रमाणपत्र – ०८,स्वनिधी प्रमाणपत्र – १७० , आयुष्यमान भारत कार्ड ३४१ , आभाकार्ड – ३४५ , बीपी व सुगर – २५९ , सिकलसेल तपासणी – २६ , टि बी . तपासणी २५९ , कृष्ठरोग २५९ , कामगार विभाग – ३० या

 योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले .तर आरोग्य शिबिर महिला बचत गटांचे स्टाल व उत्पादन प्रदर्शन शासकीय योजना ची माहिती स्टाल नवीन महिला बचत गटांची नोंदणी सांस्कृतिक कार्यक्रम व विविध सांस्कृतिक स्पर्धा विविध शासकीय योजनांचे स्थान व लाभार्थ्यांना लाभ वितरण महिला रोजगार मेळावा प्रोत्साहन पर बक्षीस व प्रमाणपत्राचे वितरण या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले .यावेळी विविध लाभार्थ्यांना या लाभाचे धनादेश व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले .

  सांस्कृतिक कार्यक्रमात कृषक हॉयस्कूल , बा म . सहारे प्राथमिक शाळा ,शिवाजी हायस्कूल , जि.प .नूतन शाळा व यानी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर ,संचालन लिपीक विजय पेद्दीवार तर आभार प्रदर्शन हापिज सय्यद यांनी पार पाडले .या कार्यक्रमासाठी नगरपंचायत कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .महिलांची अफाट गर्दी झाली होती . शेवटी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले .

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular