VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केले अभिवादन.
महात्मा ज्योतिबा फुले माळी समाज विकास संस्था फराडाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन.
चामोर्शी/फराडा,०४-०१-२०२४ ::- तत्कालीन समाजात असणाऱ्या अनिष्ट चालीरिती रूढी परंपरा यात गुंतलेल्या, शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या नारी शक्तीच्या प्रेरणास्रोत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी फराडा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थिताना मार्गदर्शन करताना केले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, फराडा च्या सरपंच सौ अनिताताई जितेपल्लीवार, उपसरपंच सुदर्शनजी हजारे,पोलीस पाटील तारकाबाई राऊत यांचे सह गावातील प्रतिष्ठित नागरिक मंचावर उपस्थित होते.
महात्मा ज्योतिबा फुले माळी समाज विकास संस्था फराडाच्या वतीने “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारोह” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या जयंती समारंभाच्या निमित्ताने गावांमधून अतिथींचे आगमनाप्रसंगी हर्शोउल्हासात स्वागत करून रॅली काढण्यात आली. यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
