Sunday, June 7, 2026
HomeChamorshiविकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा लाभ घ्या,, आमदार डॉ. देवरावजी...

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा लाभ घ्या,, आमदार डॉ. देवरावजी होळी…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

   वालसरा येथील विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमातून लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण.

 यात्रेला मोठ्या संख्येने परीसरातील महिला व पुरुषांची उपस्थिती. 

गडचिरोली/चामोर्शी,०४-०१-२०२४ ::-भारताला विकसित राष्ट्र करण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याची पूर्तता करण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी प्रयत्नरत आहेत केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात याकरिता विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावागावांपर्यंत पोहोचण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे या यात्रेच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनांचा सर्वसामान्य लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी वालसरा येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले.    यावेळी मंचावर भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख , भाजपा जिल्हा पदाधिकारी मधुकरजी भांडेकर , यांची उपस्थित होते.   कार्यक्रमाच्या सुरुवातीला संकल्प रथाचे स्वागत केल्यानंतर शपथ घेण्यात आली.त्यानंतर केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती संकल्प रथाच्या ध्वनीचित्रफीत मधुन देण्यात आली. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांची माहिती मान्यवरांच्या मागदर्शनामधुन देण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमासह लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरणही करण्यात आले. कार्यक्रमाला वालसरा येथील ग्रामसेविका मेश्राम, तलाठी, ग्रामपंचायतींचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पशुसंवर्धन कर्मचारी, आदीनीं सहकार्य केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular