Monday, September 14, 2026
HomeGodiyaधार्मिक,अध्यात्मिक,कार्यक्रम होणे गरजेचे,,खासदार अशोक नेते...

धार्मिक,अध्यात्मिक,कार्यक्रम होणे गरजेचे,,खासदार अशोक नेते…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन ता. देवरी जि.गोंदिया येथे आयोजित.

गोदिया/देवरी,०७-०१-२०२४::-परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन देवरी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आनंदानेे,विशाल जनसमुदायाच्या अनुयायानी आयोजित करण्यात आला होता.

 परमात्मा एक सेवक या कार्यक्रमाला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन धार्मिक व अध्यात्मिक मार्गदर्शन करतांना परमात्मा एक सेवक या अंतर्गत,दुःखी कष्टी व अज्ञानी मानवास भगवंत प्राप्तीचा निष्काम भावनेने परिचय करत सुखमय जीवन जगण्यास प्रेरित करणारे वाईट व्यसन, अंधश्रद्धा, यापासून परावृत्त करणारे मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणी प्रमाणे जनजागृती करित मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आले. अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला अशा धार्मिक, अध्यात्मिक, कार्यामुळे आचार विचार आणि संस्काराची निर्मिती होते.असे प्रतिपादन खासदार अशोक नेते.यांनी परमात्मा एक या कार्यक्रमा प्रसंगी केले.

  यावेळी मंचावर प्रविण दहिकर तालुका अध्यक्ष भाजपा देवरी, संजू ऊईके अध्यक्ष नगर पंचायत , नितेश वालोदे अध्यक्ष युवा मोर्चा,देवराव चुटे व इतर मोठया संख्येने परमात्मा एक सेवक चे सदस्य गण,नागरिक बंधू आणि भगिनीं मान्यवर उपस्थिती होते‌.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular