Tuesday, July 28, 2026
HomeGodiyaकाँग्रेसने खोटा नाटा अप प्रचार करुन मतदारांची दिशाभुल केल - माजी खा....

काँग्रेसने खोटा नाटा अप प्रचार करुन मतदारांची दिशाभुल केल – माजी खा. अशोकजी नेते यांचा कॉग्रेसवर घणाघाती हल्लाबोल आरोप…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

येणाऱ्या विधानसभेत भाजपाचा विजय निश्चितच… निवडणूकीत काँग्रेस च्या अशा अप प्रचाराला बळी पडू नका.

भाजपा गोंदिया जिल्हा महाअधिवेशन आशीर्वाद लाँन सडक/अर्जुनी येथे संपन्न.

गोंदिया:-भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्हा कार्यकारिणी विस्तारित जिल्हा महाअधिवेशन आज दिं.०४ ऑगस्ट २०२४ रोज रविवार ला आशीर्वाद लाँन सडक/अर्जुनी येथे आयोजित करण्यात आले होते.

या जिल्हा अधिवेशनाला लोकसभेत झालेल्या पराभवाची कारण मिमांसा माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक जी नेते यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बोलतांना या देशाचे यशस्वी लाडके लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी हे संविधानाच्या घटनेचा आदर व मान सन्मान करत संसदेत घटनेचा आधार घेऊनच चालतात व संपुर्ण देशात संविधान दिन साजरा करण्यात त्यांचा मौलाचा वाटा आहे.तर दुसरीकडे काँग्रेस हा खोटनाट अप प्रचार करून राजकारण करते,संविधान बदलविणार या अपप्रचाराने व महिला च्या खात्यात प्रत्येक महिन्याला साडेआठ हजार रुपये महिला च्या खात्यात खटाखट खटाखट जमा होणार अशा पद्धतीने खोटनाट बोलुन मतदारांची दिशाभुल करण्यात आली.काँग्रेसकडे विकासाभिमुख एंजेडा नाही. त्यांच्याकडे विकासात्मक दुष्टीकोन नाही. झालेल्या लोकसभेत मतदारांची दिशाभुल करत विजय संपादन केले असले तरी आगामी येणाऱ्या विधानसभेत मतदार जागृत होऊन विजयी संकल्प करणार असा विश्वास व्यक्त करत काँग्रेस वर घणाघाती हल्लाबोल आरोप करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महिला भगिनींसाठी महत्वाकांक्षी योजना असुन जास्तीत जास्त महिला भगिनींनी फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्यावा. असे प्रतिपादन मा.खा. नेते यांनी केले.

यावेळी मान.पंतप्रधान नरेंद्र जी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव तसेच राज्य सरकार चा अभिनंदनाचा ठराव पारित करून या विषयावर सविस्तर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी जिल्हा अधिवेशनाला प्रामुख्याने विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, प्रमुख मार्गदर्शक माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते,विधानपरिषद चे आमदार डॉ. परिणयजी फुके,माजी खासदार सुनिलजी मेंढे,माजी मंत्री राजकुमार जी बडोले,गोंदिया जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड.येशुलालजी उपराडे, आमदार विजयजी रहांगडाले, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकजजी रहांगडाले,माजी आमदार हेमंत जी पटले,माजी आमदार संजय जी पुराम,माजी आमदार खोमेशजी रहांगडाले, माजी आमदार भैरसिंगजी नागपुरे, भंडारा – गोंदिया जिल्हा समन्वयक विरेंद्र जी अंजनकर, माजी जि.प.अध्यक्ष विजयजी शिवणकर, माजी जि.प.अध्यक्ष नेतरामजी कटरे,सभापती महिला व बालकल्याण सौ.सविताताई पुराम,जि.प.सभापती अर्थ व बांधकाम संजयजी टेंभरे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ.रचनाताई गहाणे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोकजी इंगळे, जि.प.गटनेता लायकरामजी भेंडारकर,जिल्हा महामंत्री सुनिलजी केलंका, जिल्हा महामंत्री अनिलजी येरणे, जिल्हा महामंत्री डॉ.नाजुकजी कुंभरे,जिल्हा महामंत्री तथा या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन कर्त्या सौ.सीताबाई रहांगडाले, तसेच सर्व आघाड्यांचे प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष व मंडलाचे अध्यक्ष व कार्यकर्ते गण बंधू आणि भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular