Saturday, May 23, 2026
HomeEtapalliमाजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी – व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/एटापल्ली,१०-०१-२०२४::- तालुक्यातील येमली येथे जय पहादी पारी कुपार लिंगो क्रीडा मंडळ येमाली यांचे सौजन्याने भव्य ग्रामीण पुरुष – महिला कब्बड्डी व व्हॉलीबॉल सामने आयोजन केली आहे.या कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचे आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा आहेती बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनुमंतू जी.मडावी होते.प्रमुख अतिथी म्हणून आविसंचे एटापल्ली तालुका अध्यक्ष नंदुभाऊ मट्टामी – भामरागड आविसं तालुका अध्यक्ष सुधाकर तिम्मा होते.    सदर”हा”पुरुष – कब्बड्डी अ गट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक अजयभाऊ गावडे पोलीस पाटील उडेरा – प्रज्वलभाऊ नागुलवार सचिव आविस तथा भारतीय काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष – महेशभाऊ बिरमवार – सिनूभाऊ बिरमवार – संतोष बिरमवार यांच्या कडून देण्यात येत आहे.महिला कबड्डी ( अमर्यादित ) प्रथम पारितोषिक गोनाळे साहेब ग्रामसेवक येमली – जि.प.शाळा येमली यांच्या कडून देण्यात येत आहे.तसेच द्वितीय पारितोषिक नंदुभाऊ मट्टामी आविसं अध्यक्ष तथा महा.ग्रामसभा अध्यक्ष तालुका एटापल्ली – नानेश गावडे सचिव आ.वि.का.स.तोडसा याच्या कडून देण्यात येत आहे.

तसेच व्हॉलीबॉल सामन्याचे प्रथम पुरस्कार अहेरी पंचायत समिती माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार – मीनाताई नागुलवार नगरपंचायत उपाध्यक्ष एटापल्ली,संगीताताई दुर्वा माजी प.स.सदस्य एटापल्ली,मा.मुन्नीताई दुर्वा माजी सरपंच ग्रा.प.उडेरा यांचे कडून.तसेच द्वितीय पारितोषिक मा.किशोर पदा आ.वि.का.स.संस्था हेडरी,मा.रमेश वैरागडे सदस्य ग्रा.प.गेदा,मा.बाजीराव हिचामी संचालक आ.वि.स.का उडेरा,मा.रामाजी तुमरेटी माजी सरपंच यांच्या कडून देण्यात येत आहे.

यावेळी प्रज्वलभाऊ नागुलवार सचिव आविस तथा भारतीय कॉग्रेस कार्यकारी अध्यक्ष,सुधाकर गोटा तोडसा इलकापट्टी अध्यक्ष,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी, डोलेश मडावी,इरपा मडावी,मंगेश हलामी,महेश भाऊ बिरमवार, उमेश मडावी ग्रा.प.सदस्य येमली, शंकर सडमेक,अनिल करमरकर संचालक कृ.उ.बा.स.अहेरी,रमेश वैरागडे सदस्य ग्रा.प.गेदा,सतू भाऊ गावडे सदस्य ग्रा.प.गुरुपल्ली,जगपत गावडे,झाडे सर मुख्यद्यापक विवेकानंदशाळा,जीवन तलांडे,तिगरू पुंगटी, खामनकर सर,सुरेश दादा मटामी,नामदेव हीचामी नगरसेवक न.प. एटापल्ली,बाजीराव हीचामी संचालक आ.वि.का.स.उडेरा,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,नरेश गर्गाम,सचिन पंचार्या,प्रमोद गोडसेलवार सह आविसं काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक – मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular