Sunday, May 24, 2026
HomeChamorshiचिंचडोह बॅरेजतील पीडित शेतकऱ्यांना अनुक्रमे नुसार रजिस्ट्री करून परस्पर मोबदला त्वरित द्यावा...

चिंचडोह बॅरेजतील पीडित शेतकऱ्यांना अनुक्रमे नुसार रजिस्ट्री करून परस्पर मोबदला त्वरित द्यावा – निखिल धोडारे चामोर्शी भाजयुमो ता. अध्यक्ष यांची मागणी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/चामोर्शी,१४-०१-२०२४::- तालुक्यातील चीचडोह बॅरेज मध्ये शेतकऱ्याचे शेतजमीन बुडीत क्षेत्रात जात आहे. व त्या बाबतीत भूसंपादन करणे चालू आहे. या पूर्वी बुळीत क्षेत्रात जात असलेल्या शेतजणींनीचे सर्वेक्षण झाले असून काही शेतकरांना मोबदला देण्यात आला. पण त्यात खूप मोठा घोळ दिसून येत आहे. बोरघाट सिंचन मूलच्या कार्यलयात जाऊन विचारणा केली असता वरिष्ठ लिपिक चौधरी यांनी सांगितले कि मला या बाबतीत काही हि माहिती नाही. म्हणून त्यांच्या वरिष्ठांना विचारले असता ते सुधा उत्तरे देऊ शकले नाही. ज्या शेतकराची शेतजमीन बुळीत क्षेत्रात जात आहे. व काही शेतकराचे जमीन जात नाही तरीसुदधा त्यांचे भूसंपादन करण्यात आले. व कुठलीही नियमावली न करता ढोबळमनाने ज्यांनी काही कागदपात्राची पूर्तता केलीली होती त्यांची राजस्ट्री न करता नंतर ज्यांनी कागदपत्राची पूर्तता केली त्याचा शेतजमिनीची रजस्ट्री त्रयस्थ वेक्तीचा मार्फत शासनाचा अधिनस्त कर्मचारणी आपशी संगंमत करून जनतेचा शेतजमीची रजस्टी करून घेतले व लाभांश त्रयस्थ वेक्ती व कर्मचारी वाटून घेतले असतील असे दिसते.

        माझी शासनास व लोकप्रतिनिधी खासदार ,आमदारांना अशी मागणी आहे, कि चिंचडोह बॅरेज मध्ये जाणाऱ्या शेतजमिनीचा शेतकरायच्या ज्यांच्या कागदपात्राची पूर्तता आधी झाली आहे, त्यांची रजिस्ट्री आधी करून दयावे व ज्यानी कागदपत्राची नंतर पूर्तता केली त्यांचे नंतर रजिस्ट्री करावे. त्या अगोदर चिंचडोह बेरेजचे कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना त्रयस्थ व्यक्ती कडून त्रास केल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालय, महसूल कार्यालयावर भव्य मोर्चा काडू. शेतकऱ्यांचे अनुक्रमा नुसार रजिस्ट्री करून त्यांचा लाभ पर्सपर दयावे. त्या आधी शेतकऱ्यांना आगाऊ नोटीस देऊन कळविण्यात यावे. भूमी अधिग्रहण निधी शासनाकडे किती निधी मागणी केली आहे व किती निधी आली याची सविस्तर माहिती तहसील कार्यालय व उप विभागीय कार्यालय महसूल कार्यालय चामोर्शी यांच्या नोटीस बोर्डावार माहिती लावून पारदर्शकता आणावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी तालुका चामोर्शी च्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री निखिल भाऊ धोडरे यांनी केली आहे. अन्यथा सर्व पीडित शेतकऱ्यांना घेऊन शासनास जाब विचारण्याकरिता भव्य मोर्चा काढून अंदोलन करण्यात येईल.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular