Sunday, May 24, 2026
HomeGadchiroliमहायुतीला विजयी करण्याचा संकल्प करून कामाला लागा - आ. डॉ. देवरावजी ...

महायुतीला विजयी करण्याचा संकल्प करून कामाला लागा – आ. डॉ. देवरावजी होळी यांचे महायुतीच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात कार्यकर्त्यांना आवाहन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सह महायुतीच्या १२ घटक पक्षांचा कार्यकर्ता मेळावा गडचिरोली येथे संपन्न.

मेळाव्यामध्ये जय श्रीरामाचा मोठा गजर २२ जानेवारीला उत्सव साजरा करण्याचे केले आवाहन.

गडचिरोली,१४-०१-२०२४::-संपूर्ण जगामध्ये देशाला मानाचे स्थान मिळवून देणारे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना देशाच्या उज्वल भवितव्यासाठी  पुन्हा एकदा पंतप्रधान बनविणे आवश्यक आहे त्याकरिता राज्यामध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सह १२ घटक पक्षांच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी  विजयी संकल्प करावा असे आवाहन  गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी  महाराजा सेलिब्रेशन हॉल गडचिरोली येथे आयोजित महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या प्रसंगी केले.

मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर महायुतीचा जिल्हास्तरीय महा कार्यकर्त्यांचा मेळावा  माजी केंद्रीय मंत्री मान. सुबोधजी मोहीते,अन्न व औषध प्रशासन मंत्री मान. धर्मरावबाबा आत्राम,खा.श्री.अशोकजी नेते आमदार डॉ. देवरावजी होळी,आमदार कृष्णाजी गजबे, यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील जिल्हाध्यक्षाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महाराजा लॉन धानोरा रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे,शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हेमंत जम्बेवार,राष्ट्रवादी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, प्रहार संघटनेचे निखिल धार्मिक , भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान आघाडी प्रदेश सरचिटणीस रमेश भुरसे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,  , जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे,जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे,महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, आठवले गटाचे मेघनाथ घुटके,कवाडे गटाचे भानारकर, शिवसेनाच्या अमिता मडावी, तसेच मोठया संख्येने महायुती चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉ देवरावजी होळी म्हणाले की, आज पर्यंतच्या स्वातंत्र्याच्या काळात जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास मोदीजींच्या नऊ-दहा वर्षाच्या कालावधीमध्ये झाल्याचे जगाने मान्य केले आहे. आज संपूर्ण जग आर्थिक संकटांमध्ये असताना भारतात मात्र मोदीजींच्या नेतृत्वात विकासाचे  काम अहोरात्र सूरू आहे. त्यामूळे देशाच्या भवितव्यासाठी असा नेता पुन्हा  पंतप्रधान होणे गरजेचे आहे. त्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विजय संकल्प करून कामाला लागावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular