Friday, July 31, 2026
HomeGadchiroliभाजपा जिल्हा कार्यसमितीच्या बैठकीला आवर्जून या,, आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे आवाहन...

भाजपा जिल्हा कार्यसमितीच्या बैठकीला आवर्जून या,, आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे आवाहन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

१६ जानेवारी २०२४ रोजी सुमानंद मंगल कार्यालयामध्ये सकाळी ११ वा. बैठकीचे आयोजन.

गडचिरोली,१५-०१-२०२४::-भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा कार्य समितीची बैठक १६ जानेवारी २०२४ रोज मंगळवार ला सकाळी ११ वाजता सुमानंद सभागृह आरमोरी रोड गडचिरोली येथे निश्चित करण्यात आली असून या बैठकीला भाजपा जिल्हा कार्य समितीच्या सदस्यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या माध्यमातून केले आहे.

बैठकीला भाजपा विदर्भ प्रदेश संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर, खासदार अशोकजी नेते, आमदार डॉक्टर देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे, माजी राज्यमंत्री राजे अंबरिशराव आत्राम सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डिवार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, यांचे सह प्रमुख मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular