Friday, May 22, 2026
HomeMulcheraसमाजातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात आपली प्रगती करावी- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम...

समाजातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात आपली प्रगती करावी- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

तूंमुरगुंडा येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न.

गडचिरोली/मुलचेरा,१६-०१-२०२४::-तालुक्यातील चुटुगुंटा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या तूंमुरगुंडा येथे ‘न्यु यंग स्टार क्रीडा मंडल’ यांच्या सौजन्याने भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.    या भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटक म्हणून माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते.उद्घाटक म्हणून संबोधित करताना ते म्हणाले,आपल्या आदिवासी समाजातील युवकांनी क्रीडा स्पर्धेत पुढे आलं पाहिजे व आपले कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे,समाजातील प्रत्येक युवक प्रगती करेल तेव्हा आपला समाज प्रगती करणार,आणि समाजातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात आपली प्रगती करावी असे राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून समाजातील युवकांना आव्हान यावेळी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले.        कार्यक्रमाचे सहउद्घाटक म्हणून चुटुगुंटा सरपंच कु.साधनाताई मडावी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे,प्रमुख अतिथी म्हणून माजी उपसभापती बासू मुजुमदार,सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ उरेते,भाजपा तालुका अध्यक्ष संजीव सरकार,भाजप महामंत्री विजय बिश्वास,कडते सर,कुणघडकर साहेब,परदेशी मडावी,गिरमा सडमेक,बाबुराव वेलादि,सुभाष कुसनाके,देवाजी कोडापे,वैष्णव ठाकूर,दिलीप शेडमाके,कु.अरुणा वेलादि हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेला हजेरी लावली होती.       भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार 31001-/रु पुरस्कार माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार 21001-/रु माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्या तर्फे देण्यात आले आणि तृतीय पुरस्कार 11001-/ रु माजी समाजकल्याण सभापती सौ.माधुरीताई संतोष उरेते यांच्या कडून देण्यात आला आहे.

यावेळी महिला वर्ग गावातील युवक,युवती आणि तूंमुरगुंडा येथील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात उपस्थित होते..!

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular