VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
मा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनाला साद देत केली स्वच्छता.
शहर व ग्रामीण भागातील सर्व मंदिरांची स्वच्छता करा जनतेला आवाहन.
गडचिरोली/चामोर्शी,१६-०१-२०२४::-२२ जानेवारीला अयोध्येमध्ये होत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातील मंदिरांची स्वच्छता व्हावी याकरिता देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी मंदिराची स्वच्छता स्वतः करित तसा संदेश दिला. त्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी शहरातील मंदिर व मंदिर परिसरात जाऊन स्वतः स्वच्छता केली.
गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी या शुभ पर्वावर आपापल्या मंदिरांची स्वच्छता करून मंदीराचे सुशोभीकरण करावे असे आवाहन केले.
