Saturday, May 23, 2026
HomeMulcheraत्या नरभक्ष वाघाच्या हल्ल्यात आणखी किती बळी जाणार,, वनविभागाने नरभक्षक वाघाला तात्काळ...

त्या नरभक्ष वाघाच्या हल्ल्यात आणखी किती बळी जाणार,, वनविभागाने नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करावे,, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा तीव्र इशारा.

गडचिरोली/मुलचेरा,१७-०१-२०२४::-तालुक्यात नरभक्षक वाघामुळे सगळीकडे दहशत माजली असून या वाघाच्या हल्ल्यात दोन महिला ठार झाले.अन काही इसम जखमी झाले.असे असतांना सुद्धा संबंधित विभाग काही ही हालचाल करतांना दिसून येत नसून.जर संबंधित वनविभागाने त्या नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद न केल्यास शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन छेडण्याचं इशारा आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी दिली आहे.

मूलचेरा तालुक्यातील मथुरानगर व कोडसापूर येथील दोन महिलांवर नरभक्षक वाघाने हल्ला करून ठार केले.त्या नरभक्षक वाघामुळे मूलचेरासह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करने आवश्यक आहे.यासाठी संबंधित वनविभागाने योग्य पाऊलं उचलून आज सद्यकाळ पर्यंत वाघाचा बंदोबस्त करणारी टीम जर पोहचले नसेल.

अन्यथा समस्त शेतकरी व नागरिकांच्या उपस्थितीत 17-01-24ला ठिक 10 : 30 वाजता DFO कार्यलय समोर तीव्र आंदोलन करण्याची इशारा जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular