Saturday, May 23, 2026
HomeEtapalliश्रमसंस्कार शिबिरातून सेवेचा संस्कार - भाग्यश्री ताई आत्राम...

श्रमसंस्कार शिबिरातून सेवेचा संस्कार – भाग्यश्री ताई आत्राम…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

कर्रेम येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन.

गडचिरोली/एटापल्ली,१७-०१-२०२४::-  श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून समाजमन कळते. श्रम, सेवेचा संस्कार होऊन विविध उपक्रम व तज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानातून ऊर्जा व ज्ञानप्राप्ती होते. एकत्र काम केल्याने मैत्री भावना, सहकार्य यातून समाजसेवेचा वसा मिळतो, असे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष,सिनेट सदस्य तथा भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.     भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरी द्वारा संचालित भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय,एटापल्ली तर्फे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या.यावेळी विशेष अतिथी म्हणून गुरुपल्ली ग्रामपंचायतचे सदस्य दशरथ अडगोपुलवार,भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय इटापल्ली चे प्राचार्य डॉ.एस एन बुटे,कर्रेम चे पोलीस पाटील बाबुराव वेलादी,कर्रेमचे भूमिया नामवेद मडावी,सौ एस जि कोडापे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,आदी मान्यवर उपस्थित होते.      पुढे बोलताना गावाच्या विकासात युवकांचा सहभाग हवा सामान्य बुद्धिमत्ता असली तरी काहीही करता येते फक्त त्याला जिद्दीची जोड हवी असे त्या म्हणाल्या.तर नागरिकांनी सर्व गट-तट विसरून एक झाल्यास विकास साधता येतो असे कानमंत्रही त्यांनी दिले.

       यावेळी समृद्ध ग्राम निर्मितीमध्ये युवकांचे योगदान या विषयावर उपस्थित मान्यवरांनी ही देखील मोलाचे मार्गदर्शन केले. या शिबिरात कर्रेम येथील प्रतिष्टीत नागरिक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान सप्ताह काळात विद्यार्थ्यांनी गावातील जि प शाळा, अंगणवाडी केंद्र,समाज मंदिर, विविध वस्त्यांमध्ये जाऊन स्वच्छता मोहीम राबविली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular