Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliगडचिरोली शहरात जय श्रीराम जय श्रीराम हा एकच घोष,, संपूर्ण शहर रामाच्या...

गडचिरोली शहरात जय श्रीराम जय श्रीराम हा एकच घोष,, संपूर्ण शहर रामाच्या भक्तीत दंग…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शहरातील विविध मंदिरांना दिल्या भेटी व विविध कार्यक्रमात घेतला सहभाग.

इंदिरा गांधी चौकात श्रीरामाच्या गीतावर कार्यकर्त्यांसोबत जल्लोष करीत  धरला ठेका.

गडचिरोली,२३-०१-२०२४::- अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या च्या निमित्ताने गडचिरोली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण शहर राममय झाले . संपूर्ण शहरात फक्त जय श्रीराम जयघोष जय श्रीराम जय श्रीराम. आजचा  दिवस दिवाळी उत्सव असल्याचे   आमदार डॉक्टर देवरावजी होळी यावेळी म्हणाले.

गडचिरोली शहरातून सकाळी अभुतपूर्व अशी शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये  मातृशक्तीची संख्या लक्ष वेधणारी होती.. दिवसभरामध्ये विविध कार्यक्रमानंतर संध्याकाळी ५ वाजता इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहाच्या परिसरामध्ये रामरक्षा स्तोत्राचे ५ वेळा पठन करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण इंदिरा गांधी चौकात दीपोत्सव साजरा करून महाआरती करण्यात आली. यावेळी श्रीरामभक्तांनी श्रीरामाच्या जयघोषाने इंदिरा गांधी चौक दणाणून सोडला.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली शहरातील विविध कार्यक्रमात या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भेटी दिल्या व विविध कार्यक्रमात सहभाग घेतला. इंदिरा गांधी चौकात श्रीरामाच्या गाण्यावर कार्यकर्त्यांसोबत जल्लोष करीत ठेका धरला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular