VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त घरी दिवे लावून साजरी केली दिवाळी.
गडचिरोली/चामोर्शी,२३-०१-२०२४::- अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या सौभाग्यवती सौ बिनाराणी देवराव होळी यांनी आपल्या घरी पुष्परांगोळी टाकून, दिवे लावून दीपोत्सव साजरा केला.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या घरी प्रभू श्री रामचंद्राच्या मुर्तीची विधिवत पूजा केली. यानिमित्त त्यांनी समस्त जनतेला शुभेच्छा ही दिल्यात.
