VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
पाणी समस्याबाबत लवकरच सोडविण्याचे ग्रामस्थांना आमदार डॉ. देवराव जी यांनी दिले आश्वासन.
गडचिरोली/चामोर्शी,२३-०१-२०२४::- तालुक्यातील मार्कंडा कंन्सोबा प्रभाग क्रमांक दोन येथील ग्रामस्थांनी आज दिनांक 23 जानेवारी रोजी गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन आपल्या प्रभागातील पाण्याची समस्या सांगितले व पाणी समस्या सोडविण्याबात निवेदनही दिले.
यावेळी नितीन बाहिरेवार, राजकुमार मुत्येलवार, अर्पित राऊत, राजू आलाम, रणजित राऊत, दीपक वाघाडे , प्रणव आत्राम आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांशी चर्चे दरम्यान आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी उपस्थित ग्रामस्थांना आपल्या प्रभागातील पाण्याची समस्या लवकरच सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे मार्कंडा कंन्सोबा येथील ग्रामस्थाना लवकरच समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
