Sunday, June 7, 2026
HomeChamorshiक्रीडास्पर्धा मधून उत्कृष्ट खेळाडू निर्माण होण्यास मदत,,आमदार डॉ. देवराव होळी...

क्रीडास्पर्धा मधून उत्कृष्ट खेळाडू निर्माण होण्यास मदत,,आमदार डॉ. देवराव होळी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

आष्टी व बोधली येथे तालुका स्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संम्मेलनाचे आमदार डॉ. देवराव जी होळी यांच्या हस्ते उदघाटन.     गडचिरोली/चामोर्शी,२३-०१-२०२४::- चामोर्शी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आष्टी व बोधली येथे दिनांक 23 जानेवारी मंगळवारी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.    यावेळी मार्गदर्शन करताना आमदार डॉ. देवराव होळी यांनी या क्रीडा स्पर्धामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या क्रीडा गुणांचा विकास होत असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खिलाडीवृत्ती, आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते. शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे मत व्यक्त केले.     यावेळी प्रामुख्याने सरपंचा बेबीताई बुरांडे, सरपंचा वनश्री चापले, बोधली चे उपसरपंचा मनीषा कुणघाडकर,, संवर्ग विकास अधिकारी चामोर्शी सागर पाटील साहेब, माजी सभापती मारोतराव इचोडकर, माजी उपसभापती विलासभाऊ दशमुखे, गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, माजी जि. प. सदस्य धर्मप्रकाश जी कुकुडकर,  भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, शिवसेना जिल्हा प्रमुख राकेशभाऊ बेलसरे, केंद्र प्रमुख कोरेवार सर, नितीनभाऊ कुणघाडकर, शरद जी अलमनकार, शंकर जी मारशेट्टीवार भगवान जी चिलंगे, राकेश चौधरी, गीता चिलंगे, विठ्ठल पिपरे, सुजाता पिपरे, इंदिरा नैताम, राजेंद्र निकुरे, केंद्र प्रमुख, शिक्षक, तथा ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular