Saturday, May 23, 2026
Homeछत्तीसगडनवीन पोलीस कॅम्प सुरक्षेच्या दरम्यान नक्षलवाद्यांनी केला मोठा घात पात ,, तीन...

नवीन पोलीस कॅम्प सुरक्षेच्या दरम्यान नक्षलवाद्यांनी केला मोठा घात पात ,, तीन जवान शहीद तर १४ जवान जखमी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

 छत्तीसगड/टेकलगुडेम,०१-०२-२०२४::-छत्तीसगडमधील सुकमा आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमा वरती भागात असलेल्या टेकलगुडेम मध्ये आज मंगळवार 30 जानेवारी रोजी नक्षल्यांनी मोठी घटना घडविली आहे. सीआरपीएफ कोब्रा आणि डी आर जी जवानांच्या संयुक्त पथकावर केलेल्या गोळीबारात तीन जवान शहीद झाले.तर 14 जवान जखमी झाली असून एका जवानाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

       टेकलगुडम मध्ये आजच पोलिसांनी नवीन कॅम्प उघडला असल्याचे कळते. मिळालेल्या माहितीनुसार आज मंगळवारी पोलिसांनी टेकलगुडम मध्ये नवीन कॅम्प उभारला.दरम्यान या कॅम्पच्या सुरक्षेमध्ये गुंतलेले जवान छावणीच्या स्थापनेनंतर जुनागुड्डा- अलीगुडा परिसरात गस्तीवर होते. यावेळी आधीच दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जवानावर गोळीबार केला. 100 हून अधिक बिजीएल ही सोडले. दरम्यान जवानांनी मोर्चा सांभाळत प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला. दोन्ही बाजूंनी काही तास झालेल्या चकमकीत 14 जवान जखमी झाले तर 3 जवान शहीद झाले. जखमी जवानांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने रायपूरला पाठवले गेले आहे. सदर घटनेने पुन्हा एकदा नक्षली सक्रिय असल्याचे दिसून येत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular