VAINGANGA NEWS 24 प्रतिनिधी – महेंद्र सुल्वावार,
रुग्णवाहिकेने गडचिरोली ला नेत असतांना मुलींचाही मृत्यू.
गडचिरोली/एटापल्ली,०१-०२-२०२४::-एटापल्ली तालुक्यापासून एवघ्या 3 की.मी. अंतरावर तुमरगुंडा रोडवर सकाळी ११ वाजताच्या दरम्यान ट्रॅक्टर व दुचाकीचे समोरासमोर धडक दिल्याने
दुचाकीस्वार जागीच ठार व एक मुलींचाही रुग्णवाहिकेने गडचिरोली ला नेत असतांना मृत्यू झाल्याची घटना घडली.
राजू झुरू आत्राम वय (४५) व त्यांची मुलगी बाली राजू आत्राम वय (22) असे यांचे नाव आहेत.
हा अपघात इतका जबर होता की दुचाकीस्वाराच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला होता.
सदर ट्रॅक्टर ही सिमेंट पोत्याने व लोखंडी पोल नी भरली होती
जमा झालेल्या नागरिकांना 108 क्रमांकाचा रुग्णवाहिका ला अपघाताची माहिती दिली.
पुढील तपास एटापल्ली पोलीस करीत आहे.
