VÀINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
चिमूर/नागभिड,०१-०२-२०२४::-भाजपा महिला आघाडी तालुका चिमूर च्या वतीने खास मकरसंक्रांतीनिमित्त महिला-भगिनींसाठी अभ्यंकर मैदान (किल्ला) चिमूर येथे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाप्रसंगी *खासदार अशोक जी नेते व आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया * यांच्या प्रमुख उपस्थितीत नागभीड येथील *काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी शहराध्यक्ष श्री. रमेशभाऊ ठाकरे* यांच्यासह महेश अलबनकर, रवि जांभुळकर, मंगेश कुंभारे, राहुल वाघाडे, सलमान पठाण, गौरव केणे व अन्य सहकारी कार्यकर्त्यांनी *देशाचे लोकप्रिय पंतप्रधान विश्वगौरव मा.श्री. नरेंद्र मोदी जी* यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली देश बनत असून आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक एक पाऊल आत्मविश्वासाने टाकत आहे,
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि विकासाचा ध्यास असलेले राज्यातील नेतृत्व *माननीय उपमुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस व मान.ना.श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने,सांस्कृतिक कार्य,मत्स्य व्यवसाय,तथा पालकमंत्री म.रा. खासदार’ अशोक नेते, आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांच्या कार्यकर्तृत्वावर व विकसनशील ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून भाजपात पक्षप्रवेश केला. यावेळी खासदार अशोक नेते व आमदार बंटीभाऊंनी सर्वांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात सहर्ष स्वागत केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशाप्रसंगी विविध भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
