श्री.सुधीर चौधरी. श्री.जे.पी.मेश्राम.
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली,०२-०२-२०२४::-दिनांक 1/2/2024 रोज गुरुवारला घेण्यात आलेल्या सन 2024 या वर्षासाठी नवीन कार्यकारिनीचे गठन करण्यात आली. मा. श्री. सि. यू. सडमेक साहेब परिमंडळ अध्यक्ष चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदशक श्री. दयानंद हाडगे साहेब केंद्रीय उपाध्यक्ष वर्धा.तसेच मा. श्री कुणाल पाटील साहेब परिमंडळ सचिव चंद्रपूर यांच्या उपस्थितीत पार पडली. श्री .सुधीर चौधरी यांची सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना प्रविभागिय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली,तर जे. पी. मेश्राम यांची फेरनिवड सचिव पदी निवड करण्यात आली. म. रा. मा. वि. कर्मचारी संघटनेचे सभासद मोट्या संख्येने उपस्थित होते. श्री धनराज ननावरे, अमित शेंडे,मिथुन शेंडे,राज राहुलगडे, मनीष बातमवार, योगेश सलामे, अनिल नवले, बी. टी. बोरकर, सागर मसाडकर, सुरेश रामटेके, सचिन ढोके,सुरेश वराटे, राहुल शहारे,स्मृती ठवरे, आकांशा मेश्राम आदी कर्मचारी वर्गातून सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
