Saturday, May 23, 2026
HomeChamorshiबूथ सशक्त करून येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये या ईडी सरकारला धडा...

बूथ सशक्त करून येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये या ईडी सरकारला धडा शिकवायचा आहे,एड.विश्वजीत मारोतराव कोवासे सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस यांचे कार्यकर्त्यांना आव्हान…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करून जे लोक भाजपच्या विरुद्ध बोलतात त्यांना इडी, सीबीआय, चा धाक दाखवून जेलमध्ये पाठवलं जात पण अशा पळपुटे पणाला काँग्रेस पक्ष घाबरत नाही. आणि काँग्रेसचे नेते सुद्धा त्यांना घाबरत नाही. आत्ता जर काँग्रेस पक्ष शांत बसला तर येणाऱ्या काळात आपली लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.

गेल्या दहा वर्षा पासून हे केंद्रातील आणि राज्यातील सरकार शेतकरी, बेरोजगार युवक, आणि सर्वसामान्य माणसाची सातत्याने पीळवनुक करत आहे अशा निर्दयी सरकारला धडा शिकवणे काळाची गरज.   

 गडचिरोली/चामोर्शी, 08 फेब्रुवारी 2024 रोजी बालाजी सभागृह चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बूथ मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित नागपूर पदवीधर मतदार मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी माजी खासदार मा. मारोतरावजी कोवासे, माजी आमदार नामदेवजी उसेंडी, माजी आमदार आनंदराव जी गेडाम, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, नामदेव किरसान महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, लॉरेन्स गेडाम जि. युवक काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष, प्रदेश सचिव डॉ नितिन कोडवते, प्रदेश सचिव डॉ चंदा कोडवते, प्रकाश इटणकर, माजी जिल्हा अध्यक्ष LDM लताताई पेदापल्ली, जयश्री वायलवार नगराध्यक्ष चामोर्शी, लोमेश बुरांडे नगरसेवक, सुमेत तुरे, नगरसेवक प्रभाकर वासेकर कोषाध्यक्ष, अनिल कोठारे उपाध्यक्ष,रमेश कोडापे अनुसूचित जमाती सेल तालुका अध्यक्ष, रजनीकांत मोटघरे अनु जाती सेल चे जिल्हा अध्यक्ष, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश भाऊ ठाकूर,नगरसेविका भिवापूरे ताई, स्नेहा सातपुते नगरसेविका, आईंचवार ताई नगरसेविका, माजी जिल्हा परिषद सदस्य कविताताई भगत, तालुका अध्यक्ष प्रमोद जी भगत, नीलकंठजी निकारे सरपंच येनापूर, बीजन सरदार बंगाली आघाडी चे जिल्हा अध्यक्ष, प्रफुल बारसागडे युवक काँग्रेसचे अध्यक्ष, हेमंजी कुंभरे, सौ रजनी विजय तन्हेरवार महिला तालुकाध्यक्ष चामोर्शी, सौ वैशाली अजय कोमलवार शहराध्यक्ष चामोर्शी, कुमारी आचल विजय चलकवार युवती, नंदिनी हरामजी, जोशना गजानन गवारे सरपंच आमगाव महाल, आणि सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बंगाली आघाडी युवक काँग्रेस आणि विविध सेल चे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular