VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
पत्रकार परिषदेतून सुमित सरकार, उपसरपंच प्रभाष सरकार यांच्यासह ग्रा.प. पदाधिकार्यांचा आरोप.
गडचिरोली/चामोर्शी,०८-०२-२०२४::- भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल झाल्याने (कायद्यान्वये) प्रशासनाने अपात्र घोषित केले. चामोर्शी तालुक्यातील विक्रमपुर येथील ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकांत ओल्लालवार यांनी घरकुल मंजूर करण्याच्या नावाखाली पैसाची मागणी करुन व्यवहार केल्याने कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८अन्वये ,पोलीस स्टेशन चामोर्शी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याने प्रशासनाने, महाराष्ट्र शासन,ग्राम विकास विभाग व जलसंधारण विभाग मंत्रालय, मुंबई यांचे शासन परिपत्रक दिनांक १८/०६/२०११ अन्वये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम,१९५८ चे कलम ३९(१) नुसार सरपंच व सदस्य पदापासून अपात्र घोषित केल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले असल्याची माहिती सुमित सरकार, विक्रमपुर ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रभास सरकार सह ग्रा.प.सदस्यांनी पत्रकार परिषदेतुन दिलेली आहे. सविस्तर वृत्त असे की, सरपंच श्रीकांत ओल्लालवार यांनी घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी व यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नवग्राम येथील तरुण तारीनी खाॅ यांच्या कडून दहा हजार रुपयांची मागणी केली असता, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गडचिरोली येथील कार्यालयात तक्रार दाखल करुन तडजोडी अंती ९००० रुपये दिनांक ०१/०९/२०२२ ला सरपंच श्रीकांत ओल्लालवार यांनी घेतले असता संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडून पोलीस स्टेशन चामोर्शी येथे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हिच बाब लक्षात घेऊन, विक्रमपुर ग्रामपंचायतीचे सुमित सुभाष सरकार यांनी अपर आयुक्त नागपूर विभाग, नागपूर. येथे तक्रार दाखल करून सरपंच्यानी पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांना पदापासून दुर करण्यात यावे व त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली. तेव्हा संबंधित विभागाने दिनांक २९/०१/२०२४ ला अंतिम सुनावणी घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांचा दिनांक १०/११/२०२३ रोजी चा चौकशी अहवाल व अभिप्रायाचे अवलोकन करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) नुसार सरपंच श्रीकांत ओल्लालवार यांना पुढील कालावधीकरिता सरपंच व सदस्य या पदापासून अपात्र घोषित करण्यात येत आहे.असा आदेश अपर आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांनी दिनांक ०१/०२/२०२४ ला दिलेला असल्यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले. या पत्रकार परिषदेला सुमित सुभाष सरकार, उपसरपंच प्रभास सरकार, तरुण तारीनी खाॅ,ग्रा.प.सदस्य दिपक दास,मंजु मिस्त्री,हिरामती गाईन उपस्थित होते.
याबाबत विक्रमपुरचे सरपंच श्रीकांत ओल्लालवार यांची प्रतिक्रिया,,
प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना संबंधित प्रशासनाने कोनत्याही प्रकारे माझे म्हणणे ऐकून न घेता,लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे मला दोषी ठरवून अपात्र करण्यात आले.त्यामुळे माझ्यावर करण्यात आलेले आरोप सुडभावनेने ,चुकीचे आणि निरर्थक असुन राजकीय द्वेषापोटी करण्यात आलेले आहेत.याबाबत मी संबंधितांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
