Tuesday, September 15, 2026
HomeGadchiroli"अब कि बार फिर मोदी सरकार" जनसामान्य नागरिकांचा आत्मविश्वास...

“अब कि बार फिर मोदी सरकार” जनसामान्य नागरिकांचा आत्मविश्वास…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली शहरातील बुथ क्र.११७ व ११८ येथे गाव चलो अभियान.

     गडचिरोली,१४-०२-२०२४::- केंद्र व राज्य सरकारची यशोगाथा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे.पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे.

   भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम यांनी प्रवासी कार्यकर्ता म्हणून बुथ संयोजक शहर महामंत्री विवेकजी बैस यांच्या सोबत बुथ क्र.११७ व ११८ येथे गाव चलो अभियानांतर्गत घरोघरी जाऊन केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती दिली.

   याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधतांना नागरिकांनी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यावर विश्वास ठेवून यावेळी सुद्धा केंद्रामध्ये मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारचं! येणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

   दिवार लेखन अभियांतर्गत सौ.योगीताताई पिपरे यांनी भाजप पक्षाचा चिन्ह काढून गाव चलो अभियानाची सुरवात केली.

   यावेळी जनार्धनजी साखरे,निताताई बैस,श्री.धुर्वे सर,उपेंद्रजी रोहनकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular