VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गिलगाव – कुणघाडा येथिल बूथ प्रमुख, प्रवासी कार्यकर्ता, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती.
गडचिरोली/चामोर्शी,१४-०२-२०२४::- मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात विकास कामाची माहिती जनजागृती व्हावी म्हणून भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली गाव चलो अभियान अंतर्गत मौजा कुणघाडा येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी कुणघाडा – गिलगाव जि. प. सर्कल मध्ये प्रवासी कार्यकर्ता, बूथ प्रमुख, कुणघाडा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले गाव चलो अभियानाला सुरु असून आपल्या बुथावर नियोजन करून यशस्वी पणे राबवावे असे आव्हान आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले.
याप्रसंगी प्रामुख्याने भाजपा तालुका अध्यक्ष आनंदभाऊ भांडेकर, भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, किशोरजी गटकोजवार, युमो उपाध्यक्ष प्रतीक राठी जितूभाऊ कुणघाडकर, केशवजी मेश्राम, विलासजी कुकडे, अमोल लोहबळे, गुरूदास गेडाम, वसंत कुणघाडकर, श्रावण भांडेकर, रवी कुणघाडकर, उपस्थित होते.
