Saturday, May 23, 2026
HomeEtapalliकिसान आंदोलनाचा समर्थनार्थ 16 फेब्रुवारी ला गटटा बंद चे आव्हाहन - भाकपा...

किसान आंदोलनाचा समर्थनार्थ 16 फेब्रुवारी ला गटटा बंद चे आव्हाहन – भाकपा तालुका एटापल्ली…

VAINGANGA NEWS 24/ प्रतिनिधी  – महेंद्र सुल्वावार,

“तहसीलदारांना दिले निवेदन”

गडचिरोली/एटापल्ली,१६-०२-२०२४::-16 फेब्रुवारी 2024 रोजीच्या देशव्यापी ग्रामीण भारत बंद व औद्योगिक क्षेत्रीय संप जाहीर समर्थन देण्यासाठी व गट्टा तालुक्याच्या मागणीसाठी दिनांक 16 फेब्रुवारी 2024 ला गट्टा मार्केट बंद राहणार 16 फेब्रुवारी 2024 रोजी संयुक्त किसान मोर्चा आणि केंद्रीय ट्रेड युनियन द्वारे देशव्यापी ग्रामीण भारत बंद आणि औद्योगिक क्षेत्रीय संप आयोजित केला जात आहे.

आम्ही या आंदोलनाला पूर्णपणे समर्थन देतो आणि गट्टा तालुक्याच्या मागणीसाठीही आवाज उठवतो. या आंदोलनामुळे 16 फेब्रुवारी 2024 रोजी गट्टा मार्केट बंद राहणार आहे. 

संयुक्त किसान मोर्चा तथा केंद्रीय ट्रेड युनियन खालील मागण्याही करत आहे:  

1.गट्टा तालुका निर्मिती करा. 

2.कामगारांसाठी न्यूनतम वेतन वाढ करा. 

3. प्रस्तावित नवीन खाणी रद्द करा.

4. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करा 

4.धानाला 3100 रु MSP द्या .  

5.महागाई नियंत्रित करा,बेरोजगारी दूर करा . 

6.एमएसपीची हमी कायद्याने द्या: किसानांना त्यांच्या पिकाची योग्य किंमत मिळेल याची खात्री करण्यासाठी एमएसपी (न्यूनतम आधारभूत किंमत) कायद्याने द्यावी अशी मागणी आहे.

7. शेतकार्यावरील कर्ज माफ करा: देशभरातील शेतकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कर्ज जमा झाले आहे. हे कर्ज माफ करा. 

8. कामगार कर्मचारी विरोधी चार श्रमसंहिता रद्द करा. 

9. शासकीय,निमशासकीय विभागात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांना कायम करा. 

10. एटापल्ली ते गट्टा रस्ता नवीन डांबरीकरण करा. 

11. गट्टा जि.प क्षेत्रात धान साठवणूक करण्यासाठी नवीन मोठे गोडाउन बांधकाम करून द्या. 

12. सर्वे करून पीकविमा ची भरपाई द्या. 

13. गट्टा जि.प क्षेत्रात वीज जात येत असते यावर उपाययोजना करून वीज पुरवठा नियमित करा. 

14.दमकोंवाही प्रस्तावित खदान रद्द करा. 

15. गट्टा येथे पेट्रोल पंप व गॅस एजन्सी द्या.  

या मागणी साठी सुरजागड पारंपरिक इलाका समिती अध्यक्ष सैनूजी गोटा,संयुक्त किसान मोर्चा तथा केंद्रीय ट्रेड युनियन एटापल्ली कॉ.सचिन मोतकुरवार तालुका सचिव,

कॉ.विशाल पुज्जलवार,कॉ.सुरज जक्कुलवार,कॉ.प्रशांत तेलकुंटलवार,कॉ.तेजस गुज्जलवार,कॉ.शिवाजी नरोटी

कॉ.छाया जेट्टी,कॉ.सुमित नाडमवार हे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular